धुळमुक्त पंढरी व खड्डेमुक्त रस्त्यांच्या मागणीसाठीचे समाजसेवक अरुणभाऊ कोळी यांचे उपोषण मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर मागे..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018

पंढरपूर शहर धुळमुक्त करा व शहरातील रस्ते खड्डेमुक्त करा. पंढरीत सुरु असलेली रस्त्यांची कामे ही संथगतीने सुरु आहेत त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे. अर्बन बँक ते अंबाबाई पटांगण या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या ठेकेदारावर कारवाई करावी. या मागणीसाठी उपोषणास बसलेले समाजसेवक तथा कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष, ऑल इंडीया ओबीसी फाऊंडेशनचे राज्य संघटक अरुणभाऊ कोळी यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आपले पंढरपूर नगरपरिषदेसमोरचे उपोषण मागे घेतले आहे. यावेळी ऑल इंडिया ओबीसी फाऊंडेशनच्या युवती अध्यक्षा मनिषाताई पाटील, राज्य कार्याध्यक्ष काकासाहेब बुराडे, अमित पाटील, शहराध्यक्ष अनिल सप्ताळ व पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर तसेच नगरअभियंता दिनेश शास्त्री आदी उपस्थित होते. 

‘‘शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम प्रदक्षिणा मार्गापासून सुरु केले आहे, धुळीचा त्रास होऊ नये म्हणून प्रमुख मार्गावर पाणी मारण्याचे काम सुरु केले आहे, सर्वच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येणार आहेत. पंढरपूर अर्बन बँक, ते मटण मार्केट ते भीमा नदी या मार्गाचे काम वाळु अनुपलब्ध असल्याने वेळेत झाले नाही.’’ असे आश्‍वासन पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी एका लेखी पत्राद्वारे त्यांना दिले आहे. 

शहरातील विविध समस्यांबाबत आपण अनेकदा नगरपालिकेकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल न घेतल्याने नगरपालिकेसमोर उपोषणास बसलो होतो. परंतु मुख्याधिकार्‍यांच्या लेखी आश्‍वासनानंतर हे उपोषण स्थगीत केले आहे. आश्‍वासनांची पुर्तता वेळीच झाली नाही तर पुढील काळात आपण आंदोलन छेडणार असल्याची माहिती अरुणभाऊ कोळी यांनी ‘पंढरपूर लाईव्हशी’ बोलताना दिली.



पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments