मुलगी झाली हो ......! चळ्यातील माने गुरुजींचा असाही आदर्श ठरणारा उपक्रम !

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018

पंढरपूर- सध्याच्या युगात मुलगी वाचवा देश वाचवा’चा नारा सुरु आहे. यावर सरकार लाखो रुपये खर्च केले जात आहेत अनेक उपाय योजना राबविल्या जात आहेत. असे असताना मुलगी झाल्यावर उदासीनतेचे प्रमाण अजूनही कमी झालेले नाही ही वास्तविकता आहे. पहिली मुलगी झाली की नाकं मुरडणारी माणसं कमी नाहीत परंतु रोपळे (ता. पंढरपूर) मधील अंबिका नगर मध्ये असलेल्या जिल्हा परीषद शाळेमध्ये प्रामाणिकपणे ज्ञानदान करणारे शिक्षक संभाजी कुबेर माने यांची कथा आता जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राला आदर्शवत ठरत आहे म्हणूनच हाडाचे शिक्षक म्हणून ओळख असलेल्या माने गुरुजींचे कार्य सर्वदूर पसरत आहे.
          चळे (ता. पंढरपूर) येथे राहणारे वडील कुबेर आणि आई मंगल हे मिळेल तिथे मजुरी करून संभाजी यांना शिक्षण दिले. त्यांनी बी.ए इतिहास विषयात पूर्ण करून डी. एड. यशस्वीरीत्या पूर्ण करून रोपळ्यातील शाळेला गुरुजी म्हणून हजर झाले. त्याठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये रमत असताना अनेक उपक्रम राबवू लागले. विद्यार्थ्यांच्या वाढदिवस ते दर महिन्याच्या १५ तारखेला पदरमोड करून साजरा करतात. विद्यार्थी शाळेकडे पाठ फिरवू नये म्हणून अनेक उपक्रम राबवितात. मनोरंजनात्मक अभ्यासामुळे तेथील विध्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण झाली. मुले शाळेत रमू लागली. दरम्यान त्यांचा विवाह मनिषा यांच्याशी झाला. विवाहाला तब्बल १३ वर्षे झाली परंतु त्यांच्या जीवनात फुल उमलले नव्हते अखेर १३ वर्षानंतर माने दाम्पत्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. कुटुंबासमवेत विद्यार्थ्यांना देखील आनंद झाला. तो आनंद गुरुजींना स्वस्थ बसू देईना त्यांनी गावभर जेवण देवून आनद साजरा केला. विशेष म्हणजे मुलगी झाल्याचा त्यांना आनद गगनात मावेनासा झाला आहे हे त्यांच्या कार्यावरून दिसून येते. त्यांनी चळेमधील जवळपास एक हजार ग्रामस्थांना पंचपक्वानाचे जेवण देवून समाजामध्ये एक आदर्श प्रस्थापित केला. मुलगी झाल्याच्या आनंदात त्यांनी गाव जेवणावर तब्बल पाऊण लाख रुपये खर्च केला. यातून त्यांनी मुलींच्या जन्मानंतर नशिबाला दुषणे, मुलीचा तिरस्कार करणे या गोष्टींना हद्दपार करून मुलीचे स्वागत करावे हाच संदेश माने गुरुजींनी दिला. याचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत होत आहे. प्रस्तुत प्रतिनिधींनी भेट घेतली असता माने गुरुजीं म्हणाले की ‘समाजात शिक्षकाना एक आदराचे स्थान प्राप्त आहे. त्यामुळे समाजोपयोगी कार्य करून आदर्श निर्माण केले पाहिजे. स्तुत्य कार्याची दखल घेवून त्याचे अनुकरण करत असतात.मी पाहतोय की अनेकजण मुलगी झाली की नाराजी व्यक्त करतात, काही ठिकाणी नामकरण देखील केले जात नाही ही बाब भविष्याच्या दृष्टीनी समाजाला अधोगतीकडे घेवून जाणारी आहे. खरे तर समाजात मुलीचे स्वागत केले पाहिजे. नागरिकांच्या मनातून मुलीबद्धल असलेला तिरस्कार दूर व्हावा याच अपेक्षेने मी हा नामकरण सोहळा पार पाडला. मला मुलगी झाली तरी माझ्या शाळेत मी विद्यार्थ्यांचा साजरा करत असलेल्या वाढदिवसात मुळीच खंड पडू देणार नाही. भविष्यात मुलींसाठी अनेक उपक्रम राबवून ते पूर्णत्वास नेणार आहे. माने गुरुजींची मुलगी होण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे मुलीचे नाव देखील त्यांनी ‘मनस्वी’ ठेवले. गुरुजींच्या या उपक्रमामुळे समाजात नक्कीच कन्या रत्न जन्माचा पुरस्कार केला जाईल हे मात्र नक्की ! खरंच माने गुरुजींच्या या आदर्श उपक्रमाला सलाम! महाराष्ट्र शासनाने याची दखल घेवून कन्यारत्न ‘मनस्वी’सहीत माने गुरुजींच्या कुटुंबियांचा विषेश कार्यक्रम राबवून यथोचित सत्कार केल्यास समाजात अनेक माने गुरुजी तयार होतील. गाव जेवण देण्याच्या कार्यक्रमासाठी दयानंद देवळे, दत्तात्रय शिखरे, रमेश शेंबडे, हनुमंत डोंगरे, अंकुश नामदे, दत्ता माने, नवनाथ माने, नागनाथ माने, बालाजी गोवे, युवराज बनसोडे, सुनील पवार, वसंत कोळी, रणजीत लोंढे,  आदींनी परिश्रम घेतले

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments