लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कामाचा दर्जा उंचावतो -अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार
उपक्रमास विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद
पंढरपूर: ‘आपण कोणतेही कार्य सुरु करतो त्याची प्राथमिक माहिती जाणून घ्यावी, त्यानंतर त्या कार्यात काम करताना आणखी वेगळा अनुभव घ्यावा लागणार नाही आणि वेळेची देखील बचत होईल. शिकण्याच्या प्रक्रियेचे देखील तसेच आहे. आपण जे शिक्षण घेतो त्यामुळे मेंदूचा विकास होवून नवीन संशोधने निर्माण होतात. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात नंवीन क्रांती होते. आपल्या कार्यात वरिष्ठांची मदत घेतल्यास कार्याचा दर्जा उंचावण्यास मदत होते.’असे प्रतिपादन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग (पॉलिटेक्निक) मध्ये नुकतेच “टॅलेंट-हन्ट २०१८” या राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पवार उदघाटनावेळी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘स्वेरी’मध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन नेहमीच केले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून “टॅलेंट-हन्ट २०१८” चे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय उपक्रमांत मेकॅनिकल इंजीनिअरिंग, कॉम्प्युटर इंजीनिअरिंग, सिव्हील इंजीनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनिअरिंग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलेकम्युनिकेशन इंजीनिअरिंग या विविध विभागांकडून आयोजित केलेल्या विविध स्पर्धां मध्ये विविध कॉलेजेस मधून आलेल्या एकूण ६७७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये पेपर प्रेसेंटेशन, ब्लाईन्ड सी, रोबो रेसिंग, पोस्टर प्रेसेंटेशन, क्विझकॉम्पिटीशन इ. १८ उपक्रमांचा समावेश होता. या प्रत्येक उपक्रमातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थांना रोख बक्षीसे व सन्मान चिन्हे दिली गेली. तसेच सहभागी विद्यार्थ्याना प्रशस्ती पत्रे ही दिली गेली. सुनियोजन व शिस्तबद्ध कार्यपद्धती या दोन गोष्टीमुळे सदर उपक्रम संपूर्णपणे यशस्वी झाला.“टॅलेंट-हन्ट २०१८” कार्यक्रमावेळी सर्व विभाग आकर्षक व रंगीबेरंगी फुले, पताक्यांनी यांनी सजविले होते, त्यावर आकर्षक रांगोळीने साज चढविला होता तर संपूर्ण परिसर सुगंधाने दरवळत होता. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची उत्तम सोय करण्यात आली होती. यावेळी स्वेरीच्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर.जी. कुलकर्णी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक वर्ग, विध्यार्थी प्रतिनिधी अमित खडे,कार्यक्रम समन्वयक विध्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य प्रा.डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखालीउपप्राचार्य प्रा.एस.ए.बेहरे, सर्व विभागप्रमुख- प्रा.एस.व्ही.कुलकर्णी, प्रा. ए.एस.भिसे, प्रा. एच.डी.कोरडे, प्रा. ए.एस.भातलवंडे, प्रा.एम.ए.कुंभार तसेच प्रा. एस.डी.भिंगारे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर प्राचार्य प्रा.डॉ.एन.डी.मिसाळ यांनी आभार मानले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments