लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018
। पंढरपूर , प्रतिनिधी
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा दि.31 रोजी शाकंभरी मंदिराच्या सभामंडपामध्ये सरपंच पूनम दिपक गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. ग्रामसभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा सुरू असताना अचानक शाळेच्या दर्जावरून अंतर्गत वांदग सुरू झाल्यानंतर सभेमध्ये तणाव निर्माण झाला होता. तणावावर सरपंचांंनी तोडगा न काढता गोंधळातच सभा तहकूब करून ग्रामसभेमधून काढता पाय घेतला. परंतु तरीसुध्दा ग्रामसभेतील ग्रामस्थ सभेच्या ठिकाणी तटस्थ होते. त्यामुळे ग्रामस्थांनीच शेवटी विविध विषयांवर ग्रामसभेचा समारोप केला.
प्रजासत्ताक दिना दिवसाची ग्रामसभा आज दि.31 रोजी सर्वांना लाऊड स्पिकरवरून सांगून बोलविण्यात आली होती. ग्रामसभेला ग्रामस्थांबरोबर तरूणांची संख्या लाक्षणीय होती. ग्रामसभेमध्ये जेष्ठ पदाधिकारी व तरूण यांच्यामध्ये सामाजिक कार्याविषयी चर्चा होऊन विकासाला एकप्रकारे दिशा मिळणार असे मतदारांना वाटत होते. त्यातच गतपंचवार्षीक निवडणूकीत मतदारांनी सर्व उमेदवार बिनविरोध निवडून दिले आहेत. त्यामुळे एखाद्या विषयावरून गोंधळ उडत असेल तर जेष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारांना अभिप्राय असलेल्या विषयावर चर्चा करून सरपंचांनी त्यावर तोडगा काढणे गरजेचे होते. सभेचे पूर्णपणे व्हिडीओ शुटींग सुरू होते. त्याचबरोबर संपूर्ण ग्रामसभेभोवती पोलिस तैनात करण्यात आले होते. ग्रामसेवक कोळी यांनी, मागील सभेमध्ये विविध विषयांचा इतिवृत्त वाचून दाखविला. त्यानंतर पाणी पुरवठा व पाणी टंचाई, शेतीच्या पाण्यासाठी पास टाकणे, 14 वा वित्त आयोगातून झालेली कामे व प्रस्तावित मंजुर कामे, खा. राजकुमार दुत यांच्या आमदार फंडातून प्रस्तावित मंजुर निधी, प्रधानमंत्री आवास घरकुल योजना याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. कृषी सहाय्यक महामुनी, वैद्यकिय अधिकारी डॉ. जाधव व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बाबर यांनी आपल्या खात्याअंतर्गत असलेल्या योजनेविषयी माहिती सांगितली. शिक्षकांच्या अंतर्गत कलहामुळे शाळेचा दर्जा खालावत चालला आहे असा प्रश्न प्रविण शिंदे यांनी उपस्थित केल्यानंतर मुख्याध्यापकांनी दिलेल्या उत्तरावरून ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. त्यावरून थोडासा गोंधळ उडून याला एक वेगळे वळण लागून तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या तणावावर पं.स. समिती सदस्य संभाजी शिंदे व भगवान चौगुले यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना शांत राहण्याचे आवाहन करित असताना अचानकच सरपंच पूनम दिपक गवळी यांनी सभा तहकुब करून सभेमधून काढता पाय घेतला. तरीसुध्दा ग्रामस्थ तटस्थ राहिल्यामुळे ग्रामसभा पुढे सुरूच होती. ग्रामसभा तहकुब करायची होती तर ग्रामसभा बोलवलीच का? असा प्रश्न यावेळी ग्रामस्थांमधून उपस्थित केला गेला.
या सभेप्रसंगी पं.स.संभाजी शिंदे, सरपंच पूनम गवळी, उपसरपंच रिदास चौगुले, इ.बा. मुलाणी, भगवान चौगुले, शिवाजी गवळी, पोलिस पाटील अर्जुन गवळी, धनाजी शिंदे, जयंत शिंदे, ग्रा.पं. सदस्य नवनाथ शिंदे, सद्दाम सय्यद, संतोष कांबळे, शिवराम गवळी, रुपाली पाटील, यांच्यासह पोलिस कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमध्ये आयत्या वेळेचे विषय राहिल्याने संभाजी शिंदे यांनी गटविकास अधिकार्यांशी संपर्क साधून सभा पूढे सूरू ठेवण्याचा प्रयत्न केला परंतू सरपंच निघून गेल्याने सभा घेता आली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी मोठी घोषणा बाजी करून सरपंचांचा तिव्र निषेध केला. यावेळी 600 ते 700 ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने ग्रामस्थ नाराज झाले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments