सिरसाळा येथे गुरूभक्ती - लोकशक्ती संगमाने शानदार शोभायात्रा; हरिनामाने नगर दुमदुमले

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018


● _उमरखेड मठाधिपती प.पु.माधवानंद महाराज यांच्या सानिध्यात महाशिवरात्री महोत्सव_● 
परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) ..
        चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेडचे मठाधिपती प.पु.माधवानंद गुरु वामनानंद स्वामी यांचा यावर्षीचा महाशिवरात्री महोत्सव सिरसाळा येथे आयोजित करण्यात आला असून या सोहळ्याचा  गुरूभक्ती - लोकशक्ती संगमाने शानदार शोभायात्रेने आज  (दि. १२) शुभारंभ झाला. आजपासून तीन दिवस या  सोहळ्यात  प.पु.माधवानंद महाराज यांचे पावन सानिध्य लाभणार आहे.भव्य शोभायात्रेने व हरिनामाने सिरसाळा नगर दुमदुमले आहे.  
             सिरसाळा येथील शिष्यवृंद व गावकरी मंडळाच्या वतीने 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने प.पु. माधवानंद गुरु वामनानंद स्वामी यांची प.पु.वामनानंद महाराज जन्मस्थळ सिरसाळा येथुन अनुसया मंगल कार्यालय परळी रोड या मार्गावरुन भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.  या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या  विविध ठिकाणाहून शिष्यवृंद येणार आहेत. 
          या सोहळ्यास भव्य शोभायात्रेने प्रारंभ झाला. भक्तीमय वातावरण, विविध प्रकारचे कलापथक, भजनी मंडळी, व भाविकांच्या न भुतो न भविष्यति अशा सहभागाची शिस्तबद्ध व शानदार  शोभायात्रा काढण्यात आली होती. चिन्मयमुर्ती संस्थान उमरखेडचे पुर्व मठाधिपती ब्रह्मलीन  प.पु.वामनानंद महाराज यांचे  जन्मस्थळ सिरसाळा येथुन शोभायात्राेला प्रारंभ झाला. ही शोभायात्रा सवाद्य व सजवलेल्या रथारूढ प.पु. माधवानंद महाराज यांच्या पावन सानिध्यात भालदार -चोपदार, मंगलकलशधारी महिला, भजनी मंडळी, ढोल पथक, गोंधळी पथक, वासुदेव पथक, शिष्यवृंद, ब्रह्मवृद व जयघोषात गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत.  कार्यक्रमस्थळ अनुसया मंगल कार्यालयात पोहचली. शोभायात्रेतील विविध कलापथकांच्या कलांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले. सिरसाळा येथील ही शोभायात्रा न भुतो न भविष्यति ठरली.  
            या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी महोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष दिगांबर पांडे, उपाध्यक्ष राजेश्‍वर पाठक, मधुसुदन  टेकाळे, कोषाध्यक्ष चंद्रशेखर देशमुख, सचिव रामराव कराड, सहसचिव प्रमोद खामगावकर, सदस्य बबनराव देशमुख, बाबासाहेब काळे, नंदकुमार जोशी, अशोक देशमुख, पारसमल ललवाणी, अशोक चव्हाण व  सर्व पदाधिकारी सदस्य , सिरसाळा  गावकरी ,नागरीक परिश्रम घेत आहेत. 

*क्षणचित्रे* .........
◆ शोभायात्रेत दिमाखदार आकर्षक चित्ररथ, घोडेस्वार, बैलगाडी इत्यादींचा समावेश.
◆ शिव-पार्वती, राधा-कृष्ण, राम-सीता, देवतांची भजने यातून  भक्तांचा आनंद ओसंडून वहात होता.
◆ महिला व भजनी मंडळांनी सुश्राव्य भजन गायन व टाळ मृदंगावर ठेका धरला.  
◆ जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , ठिकठिकाणी शोभयात्रेवर फुलांचा वर्षाव.
◆ शिस्तबद्ध नियोजनासाठी स्वयंसेवक आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments