सुशिक्षित बेरोजगारांनांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा- सुराज्य सेना

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2018

सुशिक्षित बेरोजगारांनांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा- सुराज्य सेना

निलेश चाळक बीड  :-दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे वचन देवुन हे सरकार सत्तेत आले, पण प्रत्यक्षात साडेतीन वर्षे उलटून गेली तरी किमान रोजगार सरकारला उपलब्ध करता आले नाहीत. नोकरी तर मिळत नाही पन चुकून काही जागा निघाल्या तर त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अर्ज येत आहेत. यामुळे नोकऱ्या लागत नसल्याने मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये आक्रोश वाढत आहे. तरुण दिशाहीन होत आहेत व बेरोजगारांचे लोंढे विविध संस्थांमधून बाहेर पडत आहेत पण काम नसल्याने रिकामे फिरत आहेत. यासाठी बीड जिल्ह्यातील शिकलेल्या युवक युवतींनी एकत्र येवुन सुशिषित बेरोजगार परिषद आयोजीत केली होती.यापरषदेतील चर्चा करण्यात आलेल्या मुद्दांचे निवदेन आज जिल्हाआधिकारी कार्यालयाच्या माध्यामातुन मा.मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले.

मागील काही वर्षांपासून सरकार नोकर भरती बंद करून राज्यातील लाखो रिक्त जागा अडवून ठेवत आहेत. देशातील एकूण 36 लाख मंजूर नोकऱ्या पैकी काहीही भर्ती केली नाही. या वर्षी एमपीएससीच्या केवळ 69 जागा आहेत मात्र लाखांवर अर्ज आले आहेत. यामुळे पदव्या घेऊन देखील नोकऱ्या मिळत नसल्याने राज्यातील तरुण अस्वस्थ आहे. इतर छोटे मोठे उद्योग करावे तर तेथे योजना केवळ नावालाच आहे.
सरकारने नोकर्या दिल्या पाहिजेत किंवा किमान दहा हजार रुपये बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे* 
सर्व रिक्त जागा तातडीने भराव्यात* 
कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे* 
स्पर्धा परीक्षांची फी माफ करावी
परीक्षा पारदर्शक असाव्यात* 
मुद्रा योजना व स्कील इंडियाची   अमंलबजावणी परिणामकारक करावे
सरकारी कर्मचारी  निवृत्तीचे वय कमी करून 57 वर्ष करावे* 
इत्यादी मागण्या सुशिक्षित बेरोजगार तरुणामधुन येत आहेत. यासाठी या विषयावर  सुराज्य सेना महाराष्ट्र व अभिव्यक्त ग्रुप बीड च्या माध्यमातुन दिनांक 12 फेब्रुवारि 2018 रोजी मुख्यमंत्री यांना निवेदन पाटवण्यात आले.या निवेदनावर माजी सै. आशोक येडे, सय्यद सादेक, रामधन जमाले,प्रितेश दायमा,संदीप केदार,संतोष हंगे, विनोद कुटे,आजित वावरे,नितीन राऊत,आमित साळ्वे,रषिकेश परजने ,बलाढे सिध्दार्थ,नितीन राऊत,भाई दत्ता प्रभाळे,निलेश चाळक,सय्यद सादेक, वचिष्ट बडे, धनंजय गुंदेकर,वैभव फाटक,बाळासाहेब मुळे, प्रशांत डोरले,  गणेश कोल्हे, रविराज बडे, निलेश चाळक ,राज बडे इ.ऊपस्थिती होती....


संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments