प्राप्त परिस्थितीत कार्य करतो तोच यशस्वी होतो -नामदार शेखर चरेगावकर

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018


स्वेरीत ‘वैभवशाली राष्ट्रनिर्मिती मधील आजच्या युवकांचे स्थान व आगामी कार्याची दिशा’ या विषयावर व्याख्यान संपन्न.
 पंढरपूर- ‘राष्ट्रनिर्मिती करताना स्वतः गंभीरपणे व धीटपणे उभा राहून नम्रतापूर्वक कार्य केल्यास तसेच स्वतःमधील ‘मी पणा’ सोडल्यास ‘पदे’ आपोआप चालून येतात. एवढेच नाही तर समाजातील शेवटचा माणूस जोपर्यंत सुखी होत नाही तो पर्यंत ‘भारत समृद्ध झाला’ असे म्हणता येणार नाही. यासाठी सर्व सोयी सुविधा असणारे यशस्वी होतातच असे नाही तर प्राप्त परिस्थितीत जो कार्य करतो, प्रयत्न करतो आणि आपले इच्छीत ध्येय गाठतो. तोच आयुष्याच्या परीक्षेत यशस्वी होतो.’असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदे (राज्यमंत्री दर्जा) चे अध्यक्ष नामदार शेखर चरेगावकर यांनी केले.
         श्री विठ्ठल एज्युकेशन रिसर्च इन्स्टिट्युट संचलित कॉलेज ऑफ इंजिनीरिंग पंढरपुरच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजिलेल्या ‘वैभवशाली राष्ट्रनिर्मितीमधील आजच्या युवकांचे स्थान व आगामी कार्याची दिशा’ या विषयावर ते मार्गदर्शन करत होते. दिप्रज्वलनानंतर संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी प्रस्थावनेत कार्यक्रम आयोजिण्याचा हेतू सांगून सहकारी क्षेत्रातील ना. चरेगावकर यांची ‘पिग्मी एजंट’ पासून ते ‘थेट राज्यमंत्री’ पदापर्यंत केलेले परिश्रम, झालेली संघर्षात्मक वाटचाल आणि त्यातून मिळविलेले अतुलनीय यश यावर सविस्तर माहिती देऊन ‘आपल्या परिश्रमपूर्वक कार्याला नाविन्यतेची जोड दिल्यास मिळणारे यश हे प्रचंड सुखावह असते.’असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर सोलापूर जिल्हा सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व लोकमंगल फेडरेशनचे संचालक दिलीप पतंगे,सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष व बळीराजा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दामोदर देशमुख, सहकार भारती मंगळवेढ्याचे ता.अध्यक्ष व ‘बळीराजा’चे संचालक तात्यासाहेब चव्हाण, शिवाजी रणदिवे, विद्यार्थी प्रतिनिधी अमित खाडे हे उपस्थित होते. पुढे बोलताना ना. चरेगावकर म्हणाले की, ‘अमेरिकेमध्ये वस्तूंचे भाव वधारले आणि धंद्यात मंदी आली. हे माहित झाल्यानंतर भारतामधील बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला. यासाठी जागतिक दर्जाचे व्यवहार ज्ञान आत्मसात केल्यास व त्याच्या अभ्यासातून पुढील निर्णय घेतल्यास समाजातील व्यवहार आत्मसात करता येते. विद्यार्थ्यांना कोणत्याही क्षेत्रात करिअर करता येऊ शकते, परंतु आपले ‘ध्येय’ अगोदर निश्चित ठरवा आणि त्या दिशेने परिश्रम करून वाटचाल करा. आपल्या ध्येयात एकनिष्ठ राहिल्यास, नशीब नसतानाही आपण यशाला गवसणी घालू शकतो. याठिकाणी आपल्यावर बौद्धिक संस्कार केले जाते त्यातून मिळणाऱ्या शिक्षणात बौद्धिक क्षमता तर वाढतेच परंतु जागतिक बाजार पेठेत आपले स्थान बळकट करण्यासाठी आपल्यालाच व्यवहार ज्ञानाची अधिक माहिती घेणे आवश्यक आहे. यासाठी ध्येयापासून विचलित न होता प्रचंड मेहनत घेतल्यास यश पदरी पडते.’असे सांगून त्यांनी सहकार क्षेत्रातील अनेक उदाहरणे दिली. यावेळी बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. जी.कुलकर्णी, डिप्लोमा इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा.एस. एन. कुलकर्णी, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी मानले.

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments