लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018
स्वेरीतील राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर- गोपाळपुर (ता.पंढरपूर)येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुटसंचलित इंजिनीअरिंग व डिप्लोमा इंजिनीअरिंग अंतर्गत असलेल्या व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८८ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात सायंकाळपर्यंत जवळपास २७० विद्यार्थी व विद्यार्थींनींनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.
‘शिवजयंती’ म्हणजे तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सर्वजण शिवजयंती साजरी करताना अनेक विधायक उपक्रम राबवितात. यामध्ये स्वेरी देखील मागे नाही. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व डिप्लोमा इंजिनीअरिंग मधील राष्ट्रीय सेवा योजनेअतर्गंत ऐच्छीक रक्तदानाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे रा.से.यो.चे प्रमुख प्रा. सहदेव शिंदे डॉ.आर.एन. हरिदास तर डिप्लोमाचे प्रमुख प्रा. सुनील भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही शिवजंयतीच्या निमित्ताने रक्तदान केले. स्वेरी अंतर्गत असणाऱ्या अभियांत्रिकी (पदवी व पदविका) या महाविद्यालयाचे मिळून २७० विद्यार्थी व विद्यार्थींनींनी मिळून उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अर्थात सिव्हील हॉस्पिटल, पंढरपूर ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक या तीन रक्तपेढयांना प्राचारण करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे डॉ. अशोक राणा, सौ. राणा, संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, सौ. नाडगौडा, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थेचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी.रोंगे, यांच्यासह डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. एस.आर.गवळी, अधिष्ठाता,विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग यांनी रक्तदान करण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यासाठी विद्यार्थी विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.
छायाचित्रः-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त स्वेरीच्या इंजिनिअरिंग व फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअतंर्गंत रक्तदान शिबीर आयोजिले होते. याप्रसंगी रक्तदान करताना विद्यार्थी व विद्यार्थींनी सोबत प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक डॉ. अशोक राणा सोबत संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, सौ. नाडगौडा, संस्थेचे माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे,प्राद्यापकवर्ग व आदी.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments