पंढरपूर भाजपा, भाजयुमोच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर भाजपा व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने श्रीसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन दै. ‘निर्भीड आपलं मत’चे संपादक शेखर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी भाजयुमोचे शहराध्यक्ष विदुल अधटराव, ओबीसी शहराध्यक्ष लखन ननवरे, युवा मोर्चा सरचिटणीस सचिन भोरकडे, उपाध्यक्ष निलेश चव्हाण, उपाध्यक्ष अक्षय कदम, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत धुमाळ, ओबीसी शहर उपाध्यक्ष राहुल कोथिंमिरे, प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ कांबळे, ओबीसी सरचिटणीस अजय हुलवडे, सुमित पवार, बाळासाहेब सासवडकर, गणेश देवमारे, रवी देवमारे, सतिश सासवडकर, गणेश अंकुशराव, विकी दंदाडे, श्रीकांत ननवरे, योगेश सुरवसे, सनी कुकडे, ऋषीकेश पवार, राहुल साळुंखे, प्रमोद भोसले, चैतन्य उत्पात आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना भाजयुमोचे शहराध्यक्ष विदुल अधटराव म्हणाले की, संत गाडगेबाबांनी महाराष्ट्रामध्ये ज्ञानाबरोबरच स्वच्छतेचा संदेश दिला. आज भारतामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविले जात आहे. स्वच्छतेबाबतचा मोदींचा संदेश व संत गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनातून भाविकभक्तांना दिलेला स्वच्छतेचा संदेश या दोन्हीही संदेशांची आज देशाला खर्‍या अर्थाने गरज आहे, असे सांगून त्यांनी गाडगेबाबांच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटना उपस्थितांसमोर मांडल्या. त्यांना अभिप्रेत असलेला स्वच्छ भारत करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.




संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments