धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस जबाबदार मुख्यमंत्र्यावर व अधिकार्‍यांवर भा.द.वि.302 नुसार गुन्हे दाखल करा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणची मागणी  
 धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेतकरी धर्मा पाटील यांना सरकारच्या व मंत्र्यालयातील अधिकार्‍यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे आत्महत्या करणे भाग पडले आहे.धर्मा पाटील यांना जाणीवपुर्वक त्रास देवून आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबधीत मंत्रालयीन अधिकारी यांच्यावर भा.द.वि.कलम 302 नुसार दाखल करावा अशा आशयाचे निवेदन शरद क्रिडा व सांस्कृतीक प्रतिष्ठाणच्या वतीने तहसिलदार मधुसुधन बर्गे यांना देण्यात आले आहे.   
   या बाबत अधिक माहिती देताना प्रतिष्ठाणचे जिल्हया कार्याध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले की,विखरण येथील प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला होता. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र,त्यांना यश मिळत नसल्याने त्यांनी नैराश्यात  विषप्राशन करावे लागले,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेककर्‍यांच्या हिताच्या विरोधात जाणीवपुर्वक वर्तन करीत असून या सरकारचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवयाचे दात वेगळे आहेत.राज्यात गेल्या तीन वर्षाच्या काळात झालेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या या केवळ शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे झालेल्या आहेत.धर्मा पाटील हे वारंवार मंत्रालयात हेलपाटे मारत असताना व न्याय देण्याची मागणी करीत असताना त्यांना आत्महत्या  करण्यास भाग पाडण्यात आले आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह संबधीत अधिकार्‍यांवर तातडीने हत्येचा गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्हास उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
  हे निवेदन देताना पोपट चव्हाण,विष्णू रणदिवे,विलास कवडे,सतिश गवळी,पप्पू कोळेकर,भरत खरात,दत्ता गायकवाड,दादा खरात आदींसह प्रतिष्ठाणचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते व गुरसाळे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.    




संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments