लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 22 फेब्रुवारी 2018
स्वेरी फार्मसीमध्ये रा.से.यो.च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
पंढरपूर- ‘स्वेरीच्या सामाजिक बांधीलकी व राबिवण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले व रक्तदानाचे स्त्री रोग उपचारातीला महत्व स्पष्ट केले तसेच रक्त हे नैसर्गिकरित्या तयार होणारा मानवी शरीरातील घटक असून जगातील कोणत्याही फॅक्टरी मद्ये रक्त तयार होत नाही. स्त्रियांच्या अनेक आजारामध्ये रक्ताची निकडीची गरज असते व अशा सामूहिक रक्तदान शिबिरामधूनच सामाजिक बांधिलकी जपून आपण एक श्रेष्ठदान करून रुग्णाचे प्राण वाचवू शकतो’ असे प्रतिपादन केले.
स्वेरी संचालित कॉलेज ऑफ फार्मसी,पंढरपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. स्त्रीरोग तज्ञ डॉ.सुजाता गुंडेवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. या रक्तदान शिबिरात कॉलेज ऑफ फार्मसी(डिग्री व डिप्लोमा) व कॉलेज ऑफ इंजिनीरिंग(डिग्री व डिप्लोमा) च्या सुमारे ६० रक्तदात्याने रक्तदान केले. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी गोपीबाई दमानी ब्लड बँकेचे सेक्शन इनचार्ज राजकुमार कुलकर्णी व त्यांचे सहकारी, स्वेरी फार्मसीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डी. जे. यादव, प्रा.व्ही. व्ही. मोरे, प्रा. पी. के. खुळे, प्रा. व्ही. डी. चिपडे, ग्रंथपाल प्रा. डी. व्ही. पोरे व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.या रक्तदान शिबिरासाठी स्वेरीचे सचिव डॉ. बी. पी. रोंगे, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments