माणसातील माणूसपण संपत चाललंय - अंकुश गाजरे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018

       प्रतिनिधी/ पंढरपूर
  जागतिकरणाचा माणसाच्या जीवनावर विघातक परिणाम झाला आहे,आई वडिलांना मुलगा ओळखेना, भावाला भाऊ ओळखेना,नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला,माणूस डिजिटल झाला पण मातीपासून दूर गेला, माणूस स्वार्थी बनत गेला त्यामुळं माणसांमधील माणूसपण संपत चाललं आहे ,अशी खंत येथील ग्रामीण साहित्यिक अंकुश गाजरे यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित आयोजित केलेल्या छत्रपती फेस्टिवल शिवणे या कार्यक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते,

         यावेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध कवी गणेश गायकवाड उपस्थित होते.पुढे बोलताना गाजरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आपल्या महाराष्ट्राला खूप मोठा वारसा आणि इतिहास आहे,राजांच्या विचारांचा आपण पाईक होऊया आणि हृदयाने हृदयाला दिलेली माणुसकीच्या नात्यातून हाक एकूया.शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून घेण्यासारखं खूप काही आहे ते घेऊन प्रत्येकानं माणूस होऊया ,असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले, व आपल्या कथाकथनाच्या माध्यमातून समोरच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याचवेळी कवी गणेश गायकवाड यांनी आपल्या कवितेच्या सुंदर रचना सादर करून रसिक श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या.
      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवणे ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.
Attachments area



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments