लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 22 फेब्रुवारी 2018
दंडाधिकारी चौकशीसाठी
माहिती देण्याचे आवाहन
सोलापूर, दि.21 :- सोलापूर जिल्हा मतिमंद मुलींचे बालगृहातील मुलगी सई शिवनाथ सर्डीकर हिच्या मृत्यूची दंडाधिकारी चौकशी 26 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 1 यांच्या कार्यालयात होणार आहे.


सोलापूर जिल्हा मतिमंद मुलींचे बालगृह,633, भारतरत्न इंदिरानगर, गेंट्याल थिएटर जवळ, सोलापूर येथील सई दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी मृत झाली आहे. याबाबतची एमआयडीसी पोलीस ठाणे येथे एफआयआर नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर यांचे मार्फत करण्यात आले आहे. सई हिच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी करण्याचे महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांनी कळविले आहे.
सई हिच्या मृत्यूबाबत कोणास काहीही म्हणणे द्यावयाचे असल्यास त्यांनी 26 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे असे, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी कळविले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments