लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018
पंढरपूर, दि. 21 - तालुक्यातील बादलकोट हद्दीतील भीमा नदीपात्रातून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करुन वाहतूक सुरु असताना महसूल व पोलींसाच्या पथकाने संयुक्तपणे छापा टाकून सात टिपर व एक जे.सी.बी पकडला असून, 1 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
भीमा नदीपात्रात बेकायदेशीर अवैद्य वाळू उपसाकरुन वाहतूक सुरु असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार प्रांतधिकारी अधिकारी सचिन ढोले व सहायक पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी पथके तयार केली. मौजे बादलकोट येथे बेकायदेशीर यांत्रिक यारीच्या सहाय्याने अवैद्य वाळू उपसा सुरु असताना, पथकाने छापा टाकून सात टिपर व एक जेसीबी जप्त केला आहे. तसेच संबंधितांवर करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
या धडककारवाईत नायब तहसिलदार एस.पी. तिटकारे, मंडलाधिकारी सादिक काझी, श्री.ढवळे, औसेकर,तलाठी श्री,शिंदे, श्री.काझी, व्ही.बी.जाधव, श्री.खंडागळे, वाहनचालक विजय घाडगे, योगेश अनंतकवळस यांच्यासह महसूल व पोलीस प्रशासनाचे कर्मचारी सहभागी होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments