मोदी व अमित शहा यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने पकोडे विकून निषेध

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018

पंढरपूर : प्रतिनिधी
भाजपा सरकाने देशातील बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करुन देवून प्रवाहात आणणे गरजेचे असताना उलट तरुणांना पकोडे विकण्याचा व्यवसाय करण्यास सांगीतले जात आहे. त्यामूळे तरुणांमध्ये भाजपा सरकारविरोधात तीव्र नाराजी पसरली असून याचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने भाजपा नेत्यांच्या नावावर पकोडे विकत निषेध नोंदविण्यात आला.
 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे रस्त्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे यांच्या नेतृत्वाखाली पकोडे विक्रीचा स्टॉल उभारण्यात आला. या स्टॉलवर मोदी पकोडा 100 रुपये, अमित शहा पकोडा 50रु., आणि देवेंद्र फडणवीस पकोडा 30 रु., विनोद तावडे पकोडा 10 रुपये दराने विक्री करण्यात आला.
पंतप्रधान मोदींनी भारतातील रोजगार निर्मितीच्या प्रश्‍नास उत्तर देताना म्हटले होते की, जो पकोडे विकतो अशा व्यक्तीला दररोज 200 रुपये मिळतात. असे सांगून तरुणांना नोकर्‍या देण्यापासून वंचित ठेवण्याची एकप्रकारे भुमिका घेतली आहे.व शिक्षित तरुणांचा एकप्रकारे अपमान केला आहे. त्यामुळे सरकारच्या  भुमिकेचा पकोडे विकून निषेध व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे, शरद क्रिडा प्रतिष्ठाणचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कसबे, अमोल चव्हाण, अभय पासले, फैजल इनामदार, अंकुश गायकवाड, अमर मदने, गणेश भोसले, प्रसाद भोसले, विजय कदम, अनिकेत कापसे, गणेश घोडके, गौस करमाळकर, सचिन साळुंखे, बाळू ननवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments