लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 7 फेब्रुवारी 2018
आमदार अनिलभाऊ बाबर यांनी न्यायप्रिय भूमिका घ्यावी
– सादिक खाटीक
आटपाडी:-
‘ आटपाडी – बेंगलोर ‘ या गाड्यांच्या न्याय मागण्यासाठी ‘ विटा – बेंगलोर ‘ ही नव्याने चालू केली जाणारी गाडी अडथळा ठरु नये यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर योग्य भूमिका घेतील असे मत मुस्लीम खाटीक समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष, आटपाडीचे सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी विविध दैनिकांशी बोलताना व्यक्त केले.
राज्य परिवहन महामंडळाने सुरु केलेल्या विटा ते मुंबई सेंट्रल या पहिल्या शिवशाही बससेवेचा प्रारंभ विटा येथे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते नुकताच केला गेला .मात्र दक्षिण भारतातील सोने चांदी गलाई बांधवाना फायदेशीर ठरणारी विटा ते मेंगलोर बससेवा काही तांत्रीक कारणामूळे सुरु झाली नव्हती. आता या मार्गात बदल करुन ‘ विटा ते बेंगलोर ही बससेवा सुरु केली जाणार असल्याचे वृत्त अनेक वृत्तपत्रातून आले. विटा आगारातून विटा – मेंगलोर ऐवजी “ विटा – बेंगलोर “ ही नवी गाडी चालू करण्याच्या वृत्ताने आम्हांला आनंदच झाला. विट्यातून देशाच्या कानाकोपऱ्यात गाड्या जाव्यात यात कसलेही दुमत असणार नाही. तथापि ‘ विटा – बेंगलोर ‘ ही नवी गाडी सुरु केली आहे. आता आटपाडी – बेंगलोर या नव्या गाड्यांची आवश्यकता नाही असे सांगून ‘ आटपाडी – बेंगलोर ‘ या दोन मार्गावरुन मागणी असलेल्या गाड्यांना कोणी अडथळे आणू नये त्यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी न्यायप्रिय भूमिका घ्यावी असे ही आवाहन सादिक खाटीक यांनी यावेळी केले.
दि. 22 जानेवारी रोजी राज्याचे परिवहन मंत्री ना. दिवाकर रावते यांना पाठविलेल्या खास निवेदनाव्दारे आटपाडी – बेंगलोर या दोन वेगवेगळ्या मार्गावरुन धावणाऱ्या लांबपल्याच्या शिवशाही गाड्या सुरु करण्याची मागणी केली होती. या निवेदनाच्या प्रति आमदार जयंतराव पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर, खासदार संजय राऊत, खासदार गजाननराव किर्तीकर, खासदार संजयकाका पाटील, आणि आमदार सुमनताई आर.आर.आबा पाटील यांना पाठविल्या होत्या.
आटपाडी – बेंगलोर (बेंगलरु ) ही लांब पल्याची नवीन गाडी विजापूर (विजयपूर) आणि बेळगांव (बेळगांवी) या दोन वेगवेगळ्या मार्गावरुन सुरु करण्यासंबधी आपण यापूर्वी आवाज उठविला होता. याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी आटपाडी, खानापूर, माण , खटाव, सांगोला, मंगळवेढा,जत, कवठेमहंकाळ आणि तासगांव तालूक्यातील हजारो कुटुंबे गलाई व्यवसायाच्या निमित्ताने कर्नाटक, तामीळनाडू, केरळ या राज्यांसह अगदी श्रीलंकेतही आहेत. तसेच अनेक उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने माणदेशी परिसरातल्या शेकडोंची विजापूर, बेळगांव पर्यत सतत ये –जा होत असते. शेकडो जण मिरज, कोल्हापूर आणि सोलापूर येथून रेल्वेने बेंगलोर पर्यत ये – जा करतात. आटपाडी पासून ही तिन्ही शहरे शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर आहेत. परंतू बेंगलोरहून माणदेशी तालूक्यात सरळ येण्यासाठी एस.टी. नसल्याने हे लोक विविध गाड्या बदलत माणदेशात अथवा शेजारच्या तालुक्यात येत असतात. राज्य परिवहन महामंडळाच्या आटपाडी आगारातून विजापूर आणि बेळगांव या दोन भिन्न मार्गाने बेंगलोर कडे जा - ये करणारी नवीन लांबपल्याची शिवशाही वातानुकुलीन सेवा सुरु केल्यास हजारो प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे होणार आहे. त्यासाठी महामंडळाने शिवशाही लक्झरी बसेस तातडीने उपलब्ध करुन द्याव्यात असा आग्रह यात आपण धरल्याचे सादिक खाटीक यांनी सांगीतले.
बेळगांव (बेळगांवी) मार्गे जाणारी ‘ आटपाडी – बेंगलोर ‘ (बेंगलरु) ही नवीन गाडी आटपाडी, भिवघाट, तासगांव, सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, कागल, निपाणी, संकेश्वर, बेळगांव, धारवाड,हुबळी, दावणगेरे , तुमकूर मार्गे बेंगलोर अशी जावी आणि त्याच मार्गाने परत यावी असे सुचविले होते. तथापि विटेकरांना हवे असल्यास ही गाडी आटपाडी – भिवघाट – विटा – तासगांव – सांगली अशा वर सुचविलेल्या मार्गाने बेंगलोर पर्यत गेल्यास आणि त्याच मार्गाने परत आल्यास फारसे गैरसोयीचे न ठरता ते अधिकच सोयीचे होवू शकते. तर विजापूर (विजयपूर) मार्गे जाणारी आटपाडी – बेंगलोर ही दुस-या मार्गावरील नवीन गाडी आटपाडी – जत – विजापूर – अलमट्टी, इरकल, कोप्पल , होस्पेट, चित्रदूर्ग, तुमकुर, बेंगलोर अशी जावी आणि परतीचा मार्ग हाच असावा असे आपण सुचविल्याचे सादिक खाटीक यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments