शिवजयंतीच्या निमित्ताने पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2018



छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आज पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची व शिवजयंती उत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये पोलिस अधिकारी, शिवजयंती उत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य व पंढरीतील अनेक कार्यकर्ते सहभागी होते.

यावेळी बोलताना पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे म्हणाले की, शांततेत व सलोख्यामध्ये उत्सव साजरे करण्याची परंपरा पंढरीला आहे. येथे सर्व महापुरुषांच्या जयंती व विविध उत्सव हे शांततेत पार पडतात. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीही शांततेत पार पडेल अशी खात्री आहे. सर्वांनी आपल्या शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी करावी. असे मत व्यक्त केले. 

यावेळी शिवजयंती साजरी करताना विविध सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे व कोणत्याही मंडळाच्या वतीने कुणाकडूनही कसलीच वर्गणी घेतली जाणार नसल्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीकडून सांगण्यात आले. पंढरपुरचा इतिहास सर्वांना माहित आहे. कोणत्याही महापुरुषाची जयंती आम्ही सर्व जाती धर्माचे लोक मिळुणच करतो.   कधीही कोणत्याही महापुरुषांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला  कसलेही गालबोट लावणार नाही. जयंती कोणतीही  असो  आनंद साजरा करताना सर्वच धर्मातील लोक मिळुनच असतात. पोलीस प्रशासनाने  योग्य ते सहकार्य  करावे  व शिव भक्तानीही पोलीस मित्र बनुनच पोलीसाना  सहकार्य  करावे असे आवाहन कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व ओबीसी फाऊंडेशनच राज्य अरुणभाऊ कोळी केले. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे म्हणाले की, शिवजयंतीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असावा. भगवे झेंडे दुचाकीला लावणारे शिवप्रेमी आपली व भगव्या झेंडयांची सुरक्षितता ठेवण्यासाठी सक्षम आहेत.  काँग्रेस आय चे अ‍ॅड. राजाभाऊ भादुले , शंकर सुरवसे  तसेच काही सुचना भाजपा शहर अध्यक्ष संजय वाईकर यांनीही मांडल्या. यावेळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनीही कांही सुचना मांडल्या. पंढरपूरचे सुपूत्र संग्रामसिंह गणपतराव पाटील यांची भारतीय पोलिस सेवेत आय.पी.एस. म्हणून तेलंगणा येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

डीवायएसपी निखील पिंगळे यांना कन्यारत्न... बर्फी देऊन उपस्थितांचे तोंड गोड केले..!
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर उपस्थित असलेल्या सर्वांना डीवायएसपी निखील पिंसगळे यांनी बर्फीचं वाटप करुन सर्वांंच तोंड गोड केलं. याचं कारणही तेवढंच गोड होतं... पिंसगङळे साहेबांच्या घरी आज महाशिवरात्रीच्या शुभदिनीच गोड वार्ता मिळालेली होती... साहेबांच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला होता. तसा पिंगळे साहेबांचा मुड नेहमीच आनंदी असतो, मुखावर हास्य असतं पण आजकी बात कुछ और थी। साहेबांच्या चेहर्‍यावर कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद ठळकपणे जाणवत होता. 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी नेते दिपक वाडदेकर ,  शंकर सुरवसे, स्वागत कदम, आर पी.आय चे डी.राज सर्वगोड   ओबीसी फाऊंडेशनचे  रा. कार्यध्यक्ष काकासाहेब बुराडे आर.पी.आय शहर अध्यक्ष सतोष पवार,   वाल्मिकी संघाचे संस्थापक गणेश अंकुशराव, लखन ननवरे   आर.पी.आय. चे अप्पासाहेब जाधव  संदिप पाटील,  खर्डीचे  उपसरंच   प्रणव परिचारक, अंबादास वायदंडे, नगरसेवक विक्रम शिरसट,किशोर खिलारे, महेश साठे यांचेसह अनेकजण उपस्थित होते.


संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments