लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 13 फेब्रुवारी 2018
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संशयीत दरोडेखोरास अडवताना सदर दरोडेखोराने पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये दोन पोलिस जखमी तर रस्त्यावरुन जाणार्या एकरा इसमाचा मृत्यु झाल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले आहेत. ही घटना आज मंगळवारी सायंकाळी मोहोळ मध्ये घडली असून जखमींना तातडीने सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलिस निरीक्षक कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तीन पथके करून शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता.
सायंकाळी आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले. त्यावेळी या तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले तर रस्यावरून जाणारे अबु कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला. हल्ला करून तत्काळ तिघा संशयित दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले असून उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान हल्ल्यातील जखमींना तातडीने सोलापूर येतील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून कुरेशी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ माजली असून मोठ्या प्रमाणात पोलिस दल मोहोळमध्ये दाखल झाले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments