कर्मचार्‍यांच्या मागण्या मान्य न केल्याने एप्रिलपासून नगरपरिषद कर्मचार्‍यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!



पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
गरपरिषद कर्मचा-याच्या विविध मागण्याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा होऊन सुध्दा निर्णय न झाल्याने राज्यातील सर्व नगरपरिषदा एप्रिल महिन्यामध्ये बेमुदत काम बंद आंदोलन करणार
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद् कर्मचारी समन्वय समितीची वतीने मराठी पत्रकार भवन सांगली येथे संवर्ग/कंत्राटी/रोजंदारी/सफाई/कायम नगरपरिषद व नवीन नगरपंचायत मधील कर्मचा-याच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय संघटना पदाधिका-याची बैठक राज्याचे अध्यक्ष डॉ.डी.एल. कराड यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकर, पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा.ए.बी.पाटील,कार्यध्यक्ष धंनजय पळसुले यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली. यावेळी बोलताना डॉ.डी.एल.कराड यांनी सांगितले की, नगरपरिषद कर्मचा-याच्या  वा वेतन आयोग लागु करणे,रोजंदारी ,कंत्राटी कामगार यांना कायम करणे व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाची अंमलबजावणी करणे ,२७ मार्च २००० पर्यंत रोजंदारी कर्मचा-यानां कायम करणे, नगरपरिषद कर्मचा-याना २४ वर्ष कालपद्ध पदोन्नती लागु करणे,  नवीन नगर परिषदनगर पंचायत मधील कायम  कर्मचारी सफाई कर्मचारी यांचे     समावेश चा प्रश्नासाठी  आंदोलन केल्या नंतर नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर, मा.आयुक्त तथा  संचालक विरेद्रसिंह,  मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेशी चर्चा झाली पण आश्वासना शिवाय काही मिळाले नाही शासनाने  संघटनेची फसवणूक केली आहे.तरी आपल्या ला आंदोलन शिवाय पर्याय नाही. त्यामुळे येत्या २२ फेब्रुवारी २०१८ रोजी होणा-या शासकीय कर्मचा-याच्या मंत्रालयावर काढण्यात येणा-या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील १० हजार कर्मचारी सामिल होणार आहेत. तसेच दिनांक १ मार्च २०१८ ते १० मार्च २०१८ या कालावधीत महाराष्ट्रातील कर्मचा-याच्या मागण्याच्या निवेदनावर नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी सह्या करुन पालक मंत्री,आमदार,खासदार यांना निवेदन देऊन कर्मचा-याच्या मागण्याकडे लक्षवेधतील व दि. १५ मार्च २०१८ रोजी संपुर्ण महाराष्ट्र भर नगरपरिषदे समोर निर्दशने करतील व तरीही शासनाने कर्मचा-याच्या ७ वा वेतन आयोग व इतर मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास एप्रिल मध्ये महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतील असा इशारा या बैठकीमध्ये देण्यात आला. यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रटरी सुनिल वाळुजकर यांनी सांगितले की, सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनाच्या पदाधिकारीचे बैठक आयोजीत करुन राज्यव्यापी अधिवेशन पंढरपूर येथे आयोजीत करण्यात येईल अशी घोषणा केली. यावेळी कॉ.सिध्दाप्पा कलशेट्टी,प्रकाश जाधव, नंदाताई सांळुखे, रामदास पगारे,महादेव आदापुरे, नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे, हरी माळी, शंकर अगसर,अरुण घुंडरे व राज्यातील कामगार संघटनेचे २५० पदाधिकारी उपस्थित होते.    




संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments