स्व.नारायणराव धोत्रे समाजसेवा मंडळाच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन साजरा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018

स्व.नारायणराव धोत्रे समाजसेवा मंडळाच्या वतीने गजानन महाराज प्रकट दिन साजरा  
येथील स्व.नारायराव धोत्रे बहुद्देशीय सभागृहात समाजसेवा मंडळाच्या वतीने संत गजानन महाराज प्रकट दिन उत्सव मोठया भक्तीपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी पांडुरंग सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांच्याहस्ते संत गजानन महाराजांच्या मुर्तीवर गुलालफुले अर्पण करुन महाआरती करण्यात आली.यावेेळी मा.नगराध्यक्ष दगडू धोत्रे,मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे,मा.नगराध्यक्ष सतिश मुळे, मा.उपनगराध्यक्ष नागेश भोसले,नगरसेवक संजय निंबाळकर,शंकर देवमारे,विवेक परदेशी,विक्रम शिरसट,धर्मराज घोडके,संजय पाठक,दत्तात्रय धोत्रे ,,सत्यविजय मोहोळकर,पप्पू शिंदे,महेश खिस्ते,प्रविण नागणे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
       यावेळी मा.आ.सुधाकरपंत परिचारक यांनी संत गजानन महाराज यांच्यावर स्व.नारायणराव धोत्रे यांची अपार श्रध्दा होती.व त्यांनी या उत्सावाला पंढरपूरात सार्वजनिक स्वरुप देण्याचे फार मोठे कार्य केले असल्याचे सांगीतले.या उत्सवाच्या निमित्ताने येथील सभागृहात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यामहाप्रसादाचा लाभ हजारोच्या संख्येने भाविकांनी घेतला.प्रतीवर्षी स्व.नारायणराव धोत्रे समाजसेवा मंडळाच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात येते.या उत्सवाच्या निमित्ताने आज शहरातील संत गजानन महाराज यांच्यावर अपार श्रध्दा असलेले भक्त मोठया संख्येने या ठिकाणी पुुष्पवृष्टी करण्यासाठी उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे दत्तात्रय धोत्रे यांनी आभार मानले 
   हा उत्सव उत्साहाने पार पाडण्यासाठी शिवरत्न तरुण मंडळ ज्ञानेश्‍वर नगर,आदिशक्ती तरुण मंडळ ज्ञानेश्‍वर नगर,रामजाने तरुण मंडळ डवरी गल्ली,न्यु वडार समाज गणेशोत्सव मंडळ,न्यु वडार समाज नवरात्र महोत्सव तरुण मंडळ व श्री गजानन महाराज भक्त मंडळ न्यु वडार गल्ली यांच्या विविध पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.    

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments