कोळी महासंघाचे प्रोत्साहनामुळे घरोघरी साजरी झाली शिवजयंती..! जुना सोलापूर नाका परिसरातील नागरिकांना शिवप्रतिमा व भगव्या झेंड्याची भेट!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018



पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुका कोळी महासंघाच्या प्रोत्साहनामुळे येथील वाल्मिकी नगर भागातील सोलापूर नाका परिसरात अनेक घरांमध्ये मोठया उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी कोळी महासंघाच्या वतीने प्रत्येक घरात शिवप्रतिमा व भगवा झेंडा भेट देऊन घराघरात शिवजयंती साजरी करण्याची विनंती करण्यात आली.  

कोळी महासंघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष पांडुरंग सावतराव यांच्या कल्पकतेतून या वर्षी अनोखी शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रथम चंद्रभागेच्या पैलतिरावरील सोलापूर नाक्यासमोर शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पुजन पांडुरंग सावतराव व सोमनाथ नेहतराव यांचे शुभहस्ते करण्यात आले. यानंतर या परिसरातील अनेक घरांमध्ये शिवप्रतिमा व भगवा झेंडा भेट दिला. ‘‘भगवा झेंडा आपापल्या घरावर लावा व घरामध्ये शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन करा. जेणेकरुन आपल्या मुलांच्या मनात शिवचरित्राबद्दल उत्सुकता निर्माण होईल, राजांवरचे प्रेम दृढ होईल व शिवरायांच्या इतिहासाची जाण त्यांना झाल्यानंतर आपली भावी पिढी शिवविचारातून प्रेरणा घेऊन स्वाभिमानी बनेल.’’ त्यामुळे आपापल्या घरांमध्ये शिवजयंती अवश्य साजरी करा. अशी विनंती प्रत्येक कुटूंब प्रमुखांना व कुटूंबातील सदस्यांना करण्यात आली. या विनंतीला मान देऊन या परिसरातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरात शिवजयंती उत्साहात साजरी केली. यावेळी येथील मुस्लिम समाजातील इलाई तांबोळी यांनी तर ‘‘आम्ही तुमच्यासह लगेच आमच्या घरात शिवजयंती साजरी करु!’’ असे सांगुन सन्मानाने कोळी महासंघाच्या कार्यकर्त्यांना बोलावून घेत आपल्या घरात शिवपुजन केले व घरावर भगवा झेंडा फडकावला.

इतर अनाठाई खर्च टाळून पंढरपूर तालुका कोळी महासंघाने अनोख्या पध्दतीने साजर्‍या केलेल्या या आगळ्या वेगळ्या शिवजयंतीचे कौतुक सर्वत्र होत आहे. ‘‘अशा प्रकारे प्रत्येकानेच आपापल्या घरात शिवजयंती साजरी करणं ही काळाची गरज आहे, शिवजयंतीनंतर शिवरायांची प्रतिमा आपल्या घरात दर्शनीय भागात लावावी, जेणेकरुन शिवरायांचे विचार व इतिहास प्रत्येकाच्या घरातील तरुणांना प्रेरणा देत राहतील.’’ असे मत यावेळी कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोहन सावतराव यांनी व्यक्त केले.

यावेळी कोळी महासंघाचे सोमनाथ नेहतराव, रविंद्र अधटराव, सतीश पाडुळे, मिलींद जगताप, ओंकार कोताळकर, राहुल अधटराव, रोहन वागज, नितीन नलवडे, विजय सावतराव, देविदास टोमके, अंकुश टोमके, विजय फंड, संजय फंड, दिपक सावतराव, ॠषीकेश शिंदे, अनिकेत शिंदे, अक्षय शिंदे, ओंकार नेहतराव, अनिकेत नेहतराव, मुन्ना नेहतराव, लक्ष्मण मोरे, शुभम अधटराव, अक्षय अधटराव, संजय सावतराव, राजुभाऊ सावतराव, दिगांबर सावतराव, अजय सावतराव, किसन सावतराव, आण्णासाहेब अटकळे, तानाजी अटकळे, संदीप निंबाळकर, वसंत अटकळे, किसनबापु अटकळे, दत्तात्रय सावतराव, नितीन लोंढे आदींसह अनेक कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.     



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments