लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018
उपरी ता. पंढरपूर येथील तळ्याचे मळा येथे शिवप्रेमी तरूणांनी तब्बल 75 फूट उंच व 30 फूट लांब भगवा शिवध्वज उभा करून छत्रपती शिवरायांना अनोख्या पध्दतीने जयंतीनिमित्त मानाचा मुजरा केला आहे.
तळ्याचे माळ येथे तीन हायमास्ट दिव्यांचे 700 किलोचे लोखंडी गोल भरिव पाईप एकत्र करून पाच बाय पाय फूट व 7 फूट खोल असलेल्या कट्यावर 50 मीटर चा भगवा झेंडा उभा केला आहे. या झेंड्याचे उद्घाटन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन सरपंच सरस्वती मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी सहकार शिरोमणीचे संचालक विलास जगदाळे, पै. साहेबराव नागणे, उपसरपंच आण्णासो नागणे, पांडूरंग कारखान्याचे सि.इंजिनिअर हणमंत नागणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष नवनाथ आसबे, नवरत्न ज्वेलर्सचे सुरेश (शेठ) नागणे, मा. सरपंच सुनिल नागणे, मा. उपसरपंच शहाजी मोहिते, कृष्णा नागणे, अतून नागणे, पै. सतिष नागणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव जगदाळे, महशे नागणे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व तरूण उपस्थित होते. 75 फूट भगवा शिवध्वज उभा करण्यासाठी 6 दिवस शरद नागणे, विशाल नागणे, योगेश जगदाळे, विराज नागणे, प्रविण नागणेे, आनंद खवनकर, विशाल भोसले, रणजित नागणे, प्रशांत नागणे, जगदीश नागणे, सुरज नागणे, आकाश नागणे या तरूणांनी दिवस रात्र परिश्रम घेतले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments