लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
स्वेरीत स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन
पंढरपूर- ‘आपण कठोर परिश्रम घेत आहात ही एक जमेची बाजू आहेपरंतु या ठिकाणी आपल्या भविष्याचा विचार करून आपल्याकडून परिश्रमाने अभ्यास करून घेतात त्यामुळे आपण पदवीपर्यंत यशस्वी झेप घेत आहात. पण अंतिम वर्षात गेट परीक्षा देखील त्याच जोमाने पास झालात तर त्याचा भविष्यात खूप फायदा होतो. गेटच्या तयारीमुळे प्रशासकीय सेवेच्या जवळपास दहा परीक्षांची पायाभरणी करता येईल. त्यासाठी गेट परीक्षेकडे गंभीरपणे लक्ष द्यावे.’असे प्रतिपादन सहाय्यक कार्यकारी अभियंता ओमकार शेंडूरे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले व सहायक कार्यकारी अभियंतापदावर रुजू झालेले ओमकार शेंडूरे हे स्वेरीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या उदात्त विचाराने पदवी प्राप्तीनंतर विध्यार्थी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करावे यासाठी त्यांना वेळोवेळी स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन केले जाते. स्पर्धा परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केलेले अनेक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांना उर्जा मिळते व स्पर्धा परीक्षा देण्याकडे कल वाढतो. हाच यामागचा हेतू होय. प्रारंभी स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या शेंडूरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता शेंडूरे पुढे म्हणाले की. ‘कोणताही निर्णय गोंधळून न जाता, घाईघाईने न घेता त्यावर अभ्यास करूनच निर्णय घ्या. पदवी पूर्ण झाल्यानंतर लोकसेवा आयोगाअंतर्गत असणाऱ्या जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व जीवन प्राधिकरण विभाग तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण, जिल्हापरिषद,नगरपालिका,महाराष् ट्र औदयोगिक विकास महामंडळ,महावितरण,महापारेशन, महानिर्मिती, नगररचना विभाग आणि रेल्वे विभागात नोकरी मिळू शकते. असे सांगून पदसंख्या, त्यासाठी लागणारी वयोमर्यादा व परीक्षेचे स्वरूप कसे असते हे सांगितले. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जिद्दीने परीक्षेत यश मिळविता येते. गेट परीक्षेत एक-एक मार्काला महत्व असते आणि एका मार्कानेही संधी हुकु शकते. आत्तापासूनच गेट परीक्षेची तयारी केल्यास निश्चितच यश मिळू शकते. गेट परीक्षेत मिळालेल्या यशानंतर भारतातील अग्रगण्य असणाऱ्या आय. आय.टी. मध्ये प्रवेश मिळू शकतो.’माझी सन २००९ ला सहायक अभियंता श्रेणी-१ म्हणून निवड झाली. त्यानंतर पुन्हा सन २०११ ला परीक्षा दिली आणि त्यात पुन्हा परिश्रमामुळे यश मिळाले आणि महाराष्ट्रात चौथा येऊन सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झालो. तसेच मी २००९ च्या गेट परीक्षेत ९७.५४ टक्के गुण मिळवून देशात २१० क्रमांकाने उत्तीर्ण होवून आय.आय.टी. रुरकी (जि.हरिद्वार,उत्तराखंड) मधून एम.टेक पूर्ण केले. एकूणच की आपण परिश्रमाशिवाय यश मिळवू शकत नाही. स्वेरीमधील वातावरण हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत पोषक आहे. या मिळालेल्या संधीचा फायदा घ्या आणि भविष्य उज्वल बनवा.’असे आवाहन देखील त्यांनी केले.यावेळी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व अंतिम वर्षातील जवळपास ३०० विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. रामराव सुळे यांनी केले तर प्रा. विष्णू पोरे यांनी आभार मानले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments