भाजपा महिला आघाडीच्या वतीने कर्जविषयक मार्गदर्शन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी) : पुरूषांच्या बरोबरीने महिलांनीही सक्षम झाले पाहिजे, याकरीता केंद्र व राज्य सरकार अनेक योजना राबवित आहे. बचत गटासारख्या छोट्या छोट्या उपक्रमातून अनेक महिलांच्या आर्थिक समस्या दूर होत आहेत. यातून महिलांच्या हाताला काम मिळत असून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. या महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांना कर्जविषयक मार्गदर्शन व्हावे, याकरीता महिला दिनाचे औचित्य साधत सर्वप्रथम पंढरपूर भाजपा महिला आघाडीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पद्मजा काळे, लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार भोसले, जिल्हा सरचिटणीस शीतल लादे, शहराध्यक्ष संजय वाईकर, महिला आघाडी अध्यक्षा अपर्णा तारके, सरचिटणीस आरती बसवंती, हर्षदा नगरकर आदी उपस्थित होते.
भाजपा प्रदेशच्या वतीने 8 फेबु्रवारी ते 8 मार्च हा महिना महिला दिनाचे औचित्य साधत महिलांच्या उन्नतीसाठी विविध कार्यक्रम करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात सर्वप्रथम पंढरपूर महिला आघाडीने बुधवारी दुपारी शिवयोगी मंगल कार्यालयात महिलांच्या आरोग्य तपासणीची नाव नोंदणी व कर्जविषयक मार्गदर्शनाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक नंदकुमार भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये महिलांना विविध कर्जांबाबत विस्तृत माहिती दिली. 
वर्षातील 365 दिवस लोकमंगल बँक ही सकाळी 10 ते सायं. 6 सर्वांसाठी खुली आहे. महिलांनी याचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी, छोट्या मोठ्या व्यवसायाला मदत व्हावी, याकरीता अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज लोकमंगल बँकेच्या वतीने देण्यात येते. अतिशय कमी व्याजदरात येणार्‍या या कर्जाच्या रक्कमेतून महिलांनी आपली आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन नंदकुमार भोसले यांनी केले.
पंढरपूर महिला आघाडीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीतबद्दल तसेच कार्यक्रमाबद्दल जिल्हाध्यक्षा पद्मजा काळे यांनी भरभरून कौतुक केले. त्यांनी आपल्या मनोगतात महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारांनी महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस अजय जाधव, जिल्हा सरचिटणीस शीतल लादे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर्णा तारके यांनी केले. आभार आरती बसवंती यांनी मानले. हर्षदा नगरकर व पूजा बोरामणीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपाध्यक्षा प्रतिभा नाझरकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या मार्गदर्शन शिबिरासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. या शिबिरानंतर अनेक महिलांना आधार कार्ड व पॅन कार्ड काढण्यासाठी तसेच लवकरच पंढरपूर शहरात घेण्यात येणार्‍या महा आरोग्य तपासणी शिबिरासाठी नाव नोंदणी करून घेण्यात आली.


संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments