पोलिसांवर केलेल्या हल्ल्ल्याच्या ठिकाणाची विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केली पाहणी!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018

संशयीत दरोडेखोराकडून पोलिसावर झालेल्या हल्ल्याची गंभीर दखल कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घेतली आहे. आज त्यांनी मोहोळ येथे काल मंगळवारी सायंकाळी संशयित दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु उपस्थित होते. मोहोळमध्ये घडलेल्या या घटनेत एकजण ठार तर, सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हे शाखेचे तीन पोलिस जखमी झाले होते. घटनेतील जखमींना तातडीने सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.  या घटनेची अधिक माहिती नांगरे-पाटील यांनी घेतली.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील गुन्हा प्रकटीकरण पथकाचे पोलिस निरीक्षक कुंभार आणि त्यांच्या पथकाला मंगळवेढा तालुक्यातील घडलेल्या खून आणि दरोड्यातील संशयित आरोपी मोहोळ येथे मंगळवारी  येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तीन पथके तयार करून शहरातील विविध भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला होता. 

सायंकाळी आठच्या सुमारास शिवाजी चौकात तिघे संशयित दुचाकीवरून येत असल्याचे एका पथकाला दिसले. त्यावेळी या तिघांना अडविण्याचा प्रयत्न पथकातील कर्मचाऱ्यांनी केला. याचवेळी संशयित दरोडेखोरांपैकी एकाने चाकूने अचानक पथकावर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी सचिन मागाडे, बोंबीलवार आणि लालसिंह राठोड हे जखमी झाले तर रस्यावरून जाणारे अबु कुरेशी नावाचा इसमही या हल्ल्यात जखमी झाला. हल्ला करून तत्काळ तिघा संशयित दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले असून, उर्वरित दोघांची शोध मोहिम सुरू करण्यात आली आहे. 

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments