अक्कलकोटच्या स्वामी समर्थ पालखीचे सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रस्थान

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018
वालचंदनगर (अमोल रजपूत) -  वालचंदनगर ता.इंदापूर येथे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रस्थान झाले.
दर्शन घेता या पालखीचे !पारणे फिटेल या डोळ्याचे ! होईल सार्थक जीवनाचे ! लाभेल डोहाळे मोक्षाचे ! पदोपदी हे घडू दे दर्शन ! मुखी असूदे गुणगाण स्वामीचे ! 

वालचंदनगर शहरात स्वामी समर्थांच्या जयघोषात मंगळवारी सायंकाळी 5 वाजता आज सोलापूर जिल्ह्याचा निरोप घेऊन पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथे श्री स्वामी समर्थ पादुका पालखी सोहळ्यांचे आगमन झाले. स्वामींच्या पालखीचे भक्तीमय  स्वागत करण्यात आले .दारोदारी सडा रांगोळी काढून हातात पंचआरती निरंजनी घेऊन प्रत्येक महिलांनी मनोमन स्वागत करण्यात आले. वालचंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्यावतीने मेन काँलनी, नवीन बाजारपेठ ,पोष्टकालनी येढोल ताषाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आले.सायंकाळी ललिताबाई मंगल कार्यालयात  मुक्कामाला थांबले . वालचंदनगर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा येत असतो .आज 19वर्षे वालचंदनगर येथे पालखी सोहळ्याचे असून ही पालखी संपूर्णपणे महाराष्ट्रातील गोरगरीबाना स्वामी समर्थांचे गावोगाव दर्शन घेता यावे म्हणून मार्गस्थ झालेले आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी पालखी सोहळ्याचे वालचंदनगरीत आगमन झाल्याने परिसरातील स्वामी भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

 महिलांचा लहान मुलांचा वयोवृध्द तरूणांनी सहभाग घेतल्याने पालखी सोहळ्याला यात्रेचे स्वरूप आलेले होते. तर संपूर्ण वालचंदनगर स्वामी समर्थाच्या  जयघोषात भक्तीमय वातावरण निर्माण झालेले होते.सायंकाळी 5 वाजता वालचंदनगर येथील हनुमान मंदिरात पालखी दर्शनासाठी विसावा घेण्यात आले. उमेश सगरे व रमेश देशपांडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली रात्री 7 वाजता ललिताबाई लालचंद मंगल कार्यालय, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर एच . आर.व ई .आर आनंद नगरकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी पालखी प्रमुख संतोष भोसले यांचा सत्कार वालचंदनगरचे सरपंच छाया मोरे यांनी केले. ही पालखी अक्कलकोट येथून 23 नोव्हेंबर पासून प्रास्थान झालेली असून ही पालखी महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा  कोकण सर्वच जिल्ह्यातील गावोगाव ही पालखी प्रास्थान होत असते. जवळजवळ 7 महिने 21 दिवस पालखी दिनक्रम चालते .असे पालखी प्रमुख शावरेप्पा माणकोजी , पुजारी संयय कुलकर्णी , यांनी सांगितले .या पालखी सोहळ्याच्यावेळी वालचंदनगरचे सरपंच छाया मोरे, जेष्ट पत्रकार अतुलजी तेरखेडकर, तुषार घाडगे ,माजी वालचंदनगर सहकारी बॅक चेअरमेन शिवानंद लावंण, माजी सरपंच  हरी डोळे, वालचंदनगर स्वामी समर्थ ट्रस्टचे सचिव  रामभाऊ कुंभार , माजी सरपंच राजू भाटिया, अमोल रजपूत, माजी सरपंच बाळासाहेब दंगाणे, विजय पाटील , राधेश्याम चितोडा असंख्य महिला पुरूष तरूण व लहान मुले पालखीत सहभागी झालेले होते. 

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments