पंढरीतील भुयारी गटार योजनेच्या तिसर्‍या टप्प्याला मंजुरी- आ.प्रशांतराव परिचारक

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018



महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत पंढरपूर शहर भुयारी गटार योजना टप्पा क्रमांक 3 च्या कामांसाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार प्रशांतराव परिचारक यांनी पत्रकारांना दिली. याबाबत ची अधिक माहिती देण्यासाठी आज पंढरपूर नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी शहरातील विविध विकास कामाबाबत व भुयारी गटारीच्या तिसर्‍या टप्प्यातील कामाबाबत अधिक माहिती दिली.
भुयारी गटारीच्या तिसर्‍या टप्प्यातील कामांबाबत ते म्हणाले की, एकुण 59 कोटी 75 लाख रुपयाची ही योजना आहे. यासाठी राज्यशासनाकडून 85% प्रमाणे एकुण 50 कोटी 79 लाख रुपये तर नगरपरिषदेच्या वतीने 15% प्रमाणे 8 कोटी 96 लाख रुपयाच्या निधीची तरतुद करण्यात येणार आहे. यामध्ये 66.13 कि.मी. भुयारी गटार पाईपलाईन टाकणे, 250 मीमी डी.आय.के.- 9 पंपींग रायझींग मेन पाईपलाईन 1200 मीमी पाईपलाईन टाकणे, 400 मीमी डी.आय.के- 9 पंपींग रायझींग मेन पाईपलाईन 2000 मीमी  पाईपलाईन टाकणे, निष्णुपद व शनैश्‍वर महाराज मठ सांगोला रोड येथे मलनि:स्सारण पंप हाऊस बांधणे, 2.50 एमएलडी क्षमतेचा (एसटीपी) मलशुध्दीकरण केंद्र बांधणे आदींचा समावेश आहे.

याबरोबरच कांही वैशिष्टयेपुर्ण योजनांबद्दलची माहितीही त्यांनी यावेळी दिली. या योजनेअंतर्गत 5.84 कोटी रुपयांची विविध कामे करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यशासनाकडून 90% प्रमाणे 5 कोटी व नगरपरिषदेच्या वतीने 10% प्रमाणे 58.41 लाख रुपये एवढ्या आर्थिक निधीची तरतुद करण्यात येणार आहे.

या योजनेतील घटक पुढीलप्रमाणे आहेत.


यावेळी त्यांनी रमाई घरकुल, प्रधानमंत्री आवास योजना, यमाई तलाव सुशोभिकरण, जुन्या नगरपालिकेच्या इमारतीला हेरिटेज म्हणून मान्यता मिळवणे व इतर महत्वाच्या विकासकामांबाबतची माहितीही दिली.

या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष मलपे, नगरसेविका सौ.डांगे, सौ.नडगिरे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, नागेशकाका भोसले, नगरसेवक परदेशी, देवमारे, अभ्यंकर, सिंघण,  मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, नगरअभियंता दिनेश शास्त्री यांच्यासह नगरपरिषदेचे अनेक नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघांच्या सर्व नुतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. 

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments