लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018
नुकसान भरपाईसाठी शिवसेनेचा ठिय्या
निलेश चाऴक बीड: तीन दिवसाच्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरीत शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. गारपीटीचा फटका प्रत्यक्षात शेती उत्पदनावर झाला असून यामध्ये विदर्भ, मराठवाडा येथील शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे तालुकास्तरावरील शिवसैनिकांनी आक्रमक होऊन शसकीय मदतीची मागणी करावी असे आदेश कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्याचेच पालन आज राज्यात केले जात असून बीड येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रबी पिके आणि फळबागांचे ३३ टक्के क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, वेळेत पंचनामे करून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांविरोधी सरकार असून त्याविरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप, उल्हास गिराम, बाळासाहेब पिंगळे, विलास महराज शिंदे, किसान सेना प्रमुख परमेश्वर सातपुते, युवा सेनेचे राहूल फरताडे, गणेश् उगले, शिवराज बांगर, पंकज कुटे, संगिता चव्हाण, संजय उडाण, प्रदीप कोटूळे, रमेशा अंधुरे, सागर बहीर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments