बीड - शेतात मानवी कवटी, हाडे सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण...रक्ताने माखलेल्या दगडामुळे वेगळे वळण!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 फेब्रुवारी 2018

पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

निलेश चाळक -:बीड 
           जिल्ह्यात वाढलेल्या गुन्हेगारीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. साठ वर्षीय सालगड्याचे मुंडके धडावेगळे केल्याच्या घटनेने जिल्ह्याला थरकाप उडाला असतानाच आज लिंबागणेश परिसरात माळेवाडी ते बोरखेड रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये मानवी सांगड्याचे अवशेष दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

               ज्वारी काढण्यासाठी राजेंद्र आगवान यांच्या शेतात गेलेल्या महिलांना खोपडी आणि अन्य हाडे दिसली त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मानवी सांगड्याचे हाडे जमा केले. त्याचवेळी जवळच पंधरा ते वीस किलोचा रक्ताने माखलेला दगड त्याठिकाणी मिळून आला. त्यामुळे हा खून असावा असा अंदाज काढला जात आहे. मात्र हा मानवी सांगाडा कोणाचा व या घातपाता मागील कारणाचा तपास करण्याचे पोलिसासमोर मोठे आव्हान आहे. 
       
        गेवराई तालुक्यातल्या बेलगावमध्ये काल साठ वर्षीय सालगड्याचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्याचे धडावेगळे मुंडके केले होते. या घटनेने जिल्ह्यात थरकाप उडवून दिला असतानाच आज पुन्हा जिल्हा पोलिस दलाला आव्हान देणारी हि घटना घडली आणि जिल्हाभरात सनसनाटी निर्माण करून सोडणारी घटना लिंबागणेश परिसरात उघडकीस आली आहे. येथील राजेंद्र बाबूराव आगवान (वय ६५) यांच्या शेतामध्ये ज्वारी काढणीचे काम सुरू आहे. आगवान यांचं शेत माळेवाडी ते बोरखेड रस्त्यालगत असून महिला जेव्हा ज्वारी काढण्यासाठी त्याठिकाणी पोहचल्या तेव्हा त्या ज्वारी काढत असताना महिलांना मानवी खोपडी दिसून आली. पुढे आणखी काही मानवी हाडे दिसून आल्याने भेदरलेल्या महिलांनी या घटनेची माहिती शेतात असलेल्या अन्य लोकांना दिली. त्यानंतर ही माहिती नेकनूर पोलिसांना रात्री देण्यात आली. पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश मुंडे हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी गेले. घटनास्थळाची पाहणी करत असताना त्यांना मानवी खोपडीसह बारीक सारीक गोष्टींची पाहणी करत असताना मानवी सांगड्यातले हाडे त्याठिकाणी मिळून आले. खोपडीपासून काही अंतरावर 15 ते 20 किलोचा मोठा दगडही मिळून आला असून या दगडावर रक्ताचे डाग असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सदरील व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी बारकाईने तपास करून पंचनामा केला असून या प्रकरणाचा तपास एपीआय गणेश मुंडेंसह महेश आदटराव, पो.कॉ. रविंद्र जाधव, दीपक खांडेकर, लोखंडे यांची टीम करत आहे. सदरील मानवी हाडांसह खोपडी नेमकी कोणाची आहे हे अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी सरकारी पक्ष फीर्यादी झाला आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments