लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 23 फेब्रुवारी 2018
सोलापूर, दि.23 :- पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारुप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त झालेल्या सर्व सूचना, हरकतींची सुनावणी घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री तथा पंढरपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय देशमुख यांनी आज येथे दिल्या.
पंढरपूर विकास प्राधिकरणाच्या प्रारुप विकास आराखड्यासंदर्भात प्राप्त हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री तथा पंढरपूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी तथा प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तज्ज्ञ सदस्य नगररचनाचे निवृत्त उपसंचालक एस. व्ही. सुर्वे, निवृत्त नगररचनाकार शेखर चव्हाण, श्रीकांत जहागिरदार, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रभाकर नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. मोरे, पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, पंढरपूर विकास प्राधिकरण आराखड्यासंदर्भात मुदतीत 580 आणि मुदतीनंतर 556 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी. प्राधिकरणामार्फत विकास योजना राबविताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यासाठी प्राधिकरणाच्या सदस्यांनी रस्त्यांची, जागेची पाहणी करुन तसा अहवाल प्राधिकरणास सादर करावा. आवश्यक असणाऱ्या रस्त्यांची कामे घेण्यास प्राधान्य द्यावे. सर्व गावातील रेडी रेकनर उपलब्ध करुन घ्यावा. भूसंपादन करताना राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याबाबत आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या सूचनेचाही विचार करावा, असेही ते म्हणाले.
विहीत मूदतीत प्राप्त झालेल्या 580 हरकतींची सुनावणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांच्या कार्यालयात दिनांक 3, 4, 10 व 11 मार्च 2018 रोजी घेण्यात येणार आहे. दिनांक 3 रोजी कासेगाव, आढीव, दिनांक 4 रोजी गादेगाव, गोपाळपूर, कौठाळी, दिनांक 10 रोजी मुंढेवाडी, टाकळी, भटुंबरे, देगाव, भंडीशेगाव, चिंचोली भोसे, पंढरपूर, बोहाळी आणि दिनांक 11 रोजी वाखरी, मुंढेवाडी, शेगाव दुमाला, शेळवे, लक्ष्मी टाकळी व इतर गावातील प्राप्त हरकतींची सुनावणी घेण्यात येणार आहे. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या 556 हरकतींची सुनावणी दिनांक 23, 24 व 25 मार्च 2018 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. नाळे यांनी बैठकीत दिली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments