बसस्थानकात विषारी द्रव प्राशान केलेल्या प्रवाशाचा मृत्यू

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018

निलेश चाळक बीड:-येथील बसस्थानकात बुधवारी सकाळी एका वृद्ध प्रवाशाने विषारी द्रव प्राशन केले होते. उपचारादरम्यान सायंकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला.
पांडुरंग कदम (६५ रा. मरेगाव जि. सातारा) असे त्या वृद्धाचे नाव आहे. ते बुधवारी सकाळी बसस्थनकातील नियंत्रण कक्षासमोरील बाकावर बसले होते. तेथेच त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतून विषारी द्रव प्राशन केले. दरम्यान, सुरुवातीला शेजारी बसलेल्या प्रवाशांना त्यांनी औषध घेतले असावे असे वाटले, त्यामुळे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, पांडुरंग कदम यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यावर त्यांनी विषारी द्रव घेतल्याचे उघड झाले. त्यांना प्रवाशांनीच तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुुरु केले; परंतु सायंकाळी पाच वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी सातारा पोलिसांशी संपर्क करुन या घटनेची माहिती दिली. पांडुरंग यांच्यासोबत कोणीच नव्हते. ते बीडला कशासाठी आले होते?, विषारी द्रव का घेतले? हे अद्याप समोर आलेले नाही. जिल्हा रुग्णालय चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments