छळास कंटाळून विवाहीतेची आत्महत्या:माळापुरी येथील घटना:सहा जणावर गुन्हा दाखल

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 1 फेब्रुवारी 2018

बीड : वाहन घेण्यासाठी माहेराहून दोन लाख आणत नाही म्हणून होत असलेल्या छळास कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवारी माळापुरी येथे घडली. आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन सहा जणांवर गुन्हा नोंद झाला.  त्यापैकी दोन अटकेत असून उर्वरित चौघे फरार आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, निलोफर इम्रान बेग (२३) यांचा गेल्या काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. माळापुरी येथे सासरी त्यांचा पैशासाठी छळ सुरु झाला. नित्याच्या जाचास कंटाळून बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता निलोफर यांनी गावाजवळील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी माळापुरीत धाव घेतली. पंचनामा करुन त्यांचे प्रेत ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पती इम्रान निजाम बेग, भाया आश्पाक निजाम बेग, दिर रियाज निजाम बेग, सासरा निजाम जमाल बेग, नणंद जकीरा बेग व सासू अशा एकूण सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पती व भाया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित चौघे फरार आहेत. तपास सहायक निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ करत आहेत.

पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments