लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 2 फेब्रुवारी 2018
पंढरपूर रेल्वे स्थानक पोलिस चौकीतच सुरू असलेल्या ‘त्या’ जुगार अड्ड्यावर अखेर आज शुक्रवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकलाच.अनेक वर्षापासून बिनबोभाट चालु असलेल्या या जुगार अड्ड्यावर यापूर्वीही एकदा कारवाई झाली होती. परंतु पुन्हा या रेल्वे पोलिस चौकीतील एका ‘तात्या’ च्या ‘कृपेने’ हा जुगार अड्डा पुन्हा बिनबोभाटपणे जोरात चालु होता. येथे जुगार खेळताना रेल्वे पोलिसांचेच संरक्षण असल्याने कोणतीही दिक्कत येत नाही असा समज असल्याने पंढरपूर शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील अनेक ‘धनवान जुगारी’ येथे जुगार खेळण्यास जमत असत. विशेष म्हणजे रेल्वे पोलिस चौकीलगतच एका पत्राशेडमध्ये लोखंडी खाट व गादी तर दुसर्या पक्क्या खोलीमध्ये पंख्यासह गाद्या व लोड असे सर्व ऐषोआराम जुगार्यांच्या दिमतीला होते. आज जिल्हा पोलिस अधिक्षक विरेश प्रभु यांच्या टीमने या जुगार अड्डयावर छापा टाकल्याने जुगार्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास करण्यात आली. यावेळी 2 लाख 40 हजार रुपये रोकड आणि 9 मोटार सायकली सह 19 जुगार्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये रेल्वे पोलिसांचे 2 कर्मचारीही आहेत. या सर्व जुगार्यांना ताब्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पंढरपूर येथील रेल्वे पोलीस चौकीत शेजारील पोलीसांच्या विश्रांती खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर अखेर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आज धाड टाकली असून या धाडीत येथे जुगार खेळत असलेल्या 20 जणांना ताब्यात घेतले आहे. तर 2 लाख 40 हजार रोख ,9 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
1.संतोष शामराव कांबळे,(वय 27 रा.परमेश्वर पिपंरी ता.मोहोळ)
2.दिगंबर लक्ष्मण निकम (वय 50 रा.कुभांर गल्ली गोसावी इमारत समोर,पंढरपूर
3.संभाजी महादेव भोईटे (वय 32 रा. कोर्टी विसावा जवळ,पंढरपुर)
4.सतिश ज्ञानेश्वर कदम (वय 45 रा.भोसले चौक,पंढरपुर)
5.विजय गोविंद आसबे(वय 35रा.हणूमान मैदान,पंढरपुर)
6.सागर दगडू गाटे(वय 27 रा.दहिवडी ता.तुळजापूर)
7.सुनिल सोपाण कुराळे(वय 42 रा.सरकोली,पंढरपुर)
8.गोकुळ किसन इंदापूरकर (वय 38 रा.पारिजात वाडा स्टेशन रोड,पंढरपुर)
9.पंकज शिवाजी माने(वय 41 रा.जगदंबा नगर टाकळी रोड,पंढरपुर)
10.चेतन कृ ष्णाजी सांळूखे(वय 23 रा.सरगम चौक,पंढरपुर)
11.सुर्यकांत ज्ञानेश्वर रुपनर(वय 33 रा.नवी कुभांर गल्ली,पंढरपूर)
12.सागर किसन इंगुले(वय 30रा.खिलारवाडी ता.सांगोला)
13.तानाजी दत्तू रणदिवे (वय 55 रा.तुगंत,ता.पंढरपुर)
14.शरद पंढरीनाथ विधाते (वय 62 रा.पंढरपुर)
15.संजय रमेश शिंगाडे(वय 33 रा.गाताडे प्लॉट,पंढरपुर)
16.शहाजी सर्जेराव शेळके( वय 32 रा.आष्टी ता.मोहोळ)
17.प्रविणकुमार शंक रराव दराडे(वय 44 रा.सांगोला)
18.अबिद पाशा अब्दूल गङ्गूर (वय 52 रा.पंढरपूर)
19.आकाश धर्मा कांबळे (वय 21 जुना कराड नाका,पंढरपूर)
20.विजय झेंड (रा.डोंबे गल्ली,पंढरपूर)
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments