लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 3 फेब्रुवारी 2018
लाचखोर सोनवणेकडे एक कोटी ६० लाख रुपयांचे घबाड..!
लाचखोरीत पंढरपूर महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला मिळाली दुसऱ्यांदा पोलिस कोठडी!
पंढरपूर :- महावितरणचा उपकार्यकारी अभियंता संतोष सोनवणेला तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे.मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी आर देशमुख यांनी सरकारी पक्षाची मागणी मान्य करीत तीन दिवसांच्या पुन्हा कोठडीत रवानगी केली आहे. लाचखोरीत राज्यात पहिल्यांदाच सलग दोन वेळेस पोलिस कोठडी सुनावल्याने खळबळ माजली आहे. आरोपी तपासात संतोष सोनवणे कडे तब्बल एक कोटी ६० लाख रुपयांचे घबाड मिळाले आहे.
कार्यालयीन कर्मचाऱ्यास पुन्हा रुजु करुन घेण्यासाठी आरोपी संतोष सोनवणे आपल्या सहकार्या मार्फत १५००० रुपयांची लाच घेताना सापडला होता. ३१ जानेवारी रोजी संतोष सोनवणेला मे.जिल्हा व सत्र न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या दोन दिवसात सोनवणेचा कसून तपास करण्यात आला. या तपासात संतोष सोनावणेकडे तब्बल एक कोटी ६० लाखाची संपत्ती सापडली आहे.
आज शुक्रवारी पुन्हा मे, न्यायालयासमोर उभे केले असता. सरकारी पक्षाचे ॲड. सारंग वांगीकर यांनी आरोपी तपासात सहकार्य करीत नाही. त्यांचेकडे असणाऱ्या संपत्तीची सखोल चौकशी बाकी आहे. तसेच लाचेचा पहिला हफ्ता ४० हजार अद्याप जप्त केला नाही. असा युक्तिवाद केला. आरोपीच्या वकिलांनी यास विरोध केला. मात्र मे.न्यायाधीश श्री. पी. आर. देशमुख यांनी सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरत आरोपी संतोष सोनवणेला पुन्हा तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावली.
आरोपी संतोष सोनवणेने आपल्या पदाचा गैरवापर करीत अमाप काळा पैसा जमवला आहे. पंढरपूर शहरात पंचतारांकित बंगला बांधला आहे. तसेच शेती , प्लॉट, सोने यामध्ये पैशाची गुंतवणूक केल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात सुरु आहे. तपासात आणखी धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पुढील तपास अॅन्टीकरप्शन ब्युरोचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.अरुण देवकर हे करत आहेत.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments