लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018
निलेश चाळक बीड : तालुक्यासह माजलगांव आणि गेवराई तालुक्याला आज सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यामुळे पिकांचे आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी या घटनेची तातडीने दखल घेत जिल्हाधिका-यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयात आज सर्वच ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस झाला.
याचा सर्वाधिक फटका बीड, माजलगांव व गेवराई तालुक्याला बसला. बीड तालुक्यातील वांगी, शिवणी, माजलगांव तालुक्यातील काळेगाव, हिवरा, डुबाथडी, तालखेडचा परिसर, केसापूरी शिवार, गेवराई तालुक्यातील खळेगांव, पौळाची वाडी आदी गावांमध्ये मोठ्या गारांसह पडलेल्या पावसाने गहू, ज्वारी पिकांसह आंबा, डाळिंब आदी फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ना पंकजा मुंडेंनी दिले आदेश
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना पंकजा मुंडे यांनी तातडीने दखल घेत सकाळीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच आपण भेट देणार असून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री ना पंकजा मुंडे यांनी तातडीने दखल घेत सकाळीच जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती घेतली. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. नुकसानग्रस्त गावांना लवकरच आपण भेट देणार असून शेतक-यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे त्यांनी सांगितले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments