लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018
रोज सकाळी पेपर उघडला कि,पहिली बातमी दिसते कि खून, बलात्कार, चोरी, दरोडा, आत्महत्या अशीच, आणि आता ते इतका सवयीचा झालाय कि बहुतांश लोक अशा बातम्या वाचताच नाहीत. हे नेहमीचाच म्हणतात आणि पुढचा पान उलटतात. आपली मन मरत चालली आहेत.
शिवशाही च्या आधीची परकीय राजवट आठवा तेव्हा भारत असाच होता. दिल्ली ची जुलमी राजवट अशीच होती, तेव्हा हि असाच होता कि रस्त्याने जाताजाता बायकांना उचलून नेण. कधीही कुठेही कोणाचीही लुटालूट करण. खून करन. सरकारी कर्मचाऱ्यांचा जनतेला असाच त्रास होता, सरकार विरोधी फिर्याद करणार्याला कितीही बरोबर असला तरी उलट फोजदरी जाच असायचा. हेच सगळ होत. तेव्हा सत्ता होती परकीयांची. आनंदाने एकोप्याने भारतात राहणाऱ्या आपल्या लोकांना ग्रहण लावलं या बाबर, मुघालान्सारख्या यवनी सत्तांनी. पण मग पुन्हा सूर्योदय झाला आणि एक वेळ अशी आली जेव्हा आपल्या शिवरायांची सत्ता आली. राजा कसा असावा, राज्य कसा असावे, राज्यकारभार कसा असावा, गुन्हेगारांवर वाचक कसा ठेवावा, सरकारी नोकराने रायातेशी कसे वागावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर बदल करायचाच असेल तर प्रयत्न केला तर अपेक्षित बदल करता येतो हे शिवरायांनी केल आणि दाखवला. आपली मुठभर मराठी सेना घेऊन यावनंसारख्या शत्रूला उलथवून लावणारे शिवराय, परस्त्री बरोबर गैरवर्तन करणाऱ्या रंज्याचे पाटलाचे हाथ पाय कलम करणारे शिवराय. परस्त्री बरोबर मातेसमानच वागायला हवे हे शिकवणारे आणि आपल्या वर्तनातून ते दाखवून देणारे शिवराय. स्वतापेक्षा धर्माचे आणि धरणीचे महत्व जाणणारे आणि मानणारे शिवराय. स्वकष्टाने उभारलेले स्वराज्य कायम श्रींचे म्हणून श्री चरणी लीन होणारे शिवराय. अशाच राज्य कर्त्याची आता आपल्याला गरज आहे.
कारण तीच यवन संस्कृती परत भारतावर राज्य करू पहात आहे. देशात रोज शेकडो बलात्कारासारखे गुन्हे घडतात कित्येक गुन्हे उजेडात हि येत नाहीत. आपल्या आजूबाजूला जे चाललाय ते जोवर आपल्या स्वतावर येत नाही तोवर तिकडे न बघण्याची वृत्ती वाढत चाललीये. केंद्रात सत्ता असणारे पक्ष या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसतायत कारण त्यांना कागदोपत्री सगळ छान छान दाखवायचं. पण मांजर जेव्हा डोळे मिटून दुध पिता तेव्हा सगळ्या जगाला दूध पिताना ते मांजर दिसताच असत तसाच काही या राज्यकर्त्यांचा झालाय त्यांना वाटतंय हे जे चाललाय ते कोणाला दिसत नाहीये. पण जे हे सगळ भोगतायत त्यांना दिसायची काय गरज आहे.
आज हजारो युवक एकजूट होऊन पुन्हा सरकार विरोधी आंदोलन निदर्शन करत आहेत, गेली साठ वर्ष शांत झालेला युवा रक्त आता पुन्हा पेटून उठताय. साठ सत्तर वर्षापूर्वी हि अशीच एक परकीय सत्ता उलथवून लावणारी एक युवक क्रांती झाली होती. आत्ताही पुन्हा हा लढा लढायची वेळ येऊ लागलीये आता गरज आहे ती फक्त ह्या रक्ताला दिशा देणाऱ्या शिवराया सारख्या नेतृत्वाची. आणि अशा युवकांचे पाठबळ वाढवणाऱ्या जिजाऊ सारख्या मातांची.
"शिवाजी जन्माला यावा परंतु दुसऱ्याच्या घरात"
हि मनोवृत्ती जो पर्यंत आपण बदलत नाही तो पर्यंत हा बदल होणे शक्य नाही..
"राजे पुन्हा जन्माला या" अस म्हणण्यापेक्षा आपल्या विचारात ,आचरणात राजे आणण्याची गरज आहे...
शब्दांकन : चि.ऋषिकेश सुदर्शन शिंदे
पंढरपूर
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments