पंढरीत दिंडी क्रमांक २४ भवनमध्ये संत रोहीदास महाराज जयंती साजरी

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018
पंढपूर: पंढरपूर येथील रोहीदास  दिंडी क्रमांक २४ भवनमध्ये संत शिरोमणी रोहीदास महाराज यांच्या जयंतीसोहळ्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती सोहळ्याच्या निमीत्ताने काकडा आरती, मुर्ती पुजन, दिंडी नगर प्रदक्षणा व महाप्रसाद वाटप आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमीत्ताने विविध पुरस्कारांचे वाटप हरीदास महाराज ढवळीकर व जोगदंड महाराज यांच्या हस्ते  वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र कांबळे हे होते.

यावेळी आमदार भारत भालके, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, मर्चंट बँकेचे अध्यक्ष नागेश भोसले, ट्रस्ट अध्यक्ष  रोहीदास उगले,  जगन्नाथ वाघमारे, राम कदम, दिगंबर शेळके, डी.राज सर्वगोड, व्यवस्थापक कुमार शेलार व विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारांमध्ये श्री संत रोहीदास महाराज पुरस्कार मुंबई येथील तुकाराम महाराज शेळके यांना, वारकरी भुषण पुरस्कार सांगलीचे  तातोबा महाराज खाडे यांना व सोलापूर येथील श्रीमती अनुसया वाघमारे यांना, मृदुंगमणी पुरस्कार आळंदीचे केशव नेटके , झेंडेकरी पुरस्कार पुणे येथील शांताराम रामचंद्र सोनवणे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी नारायण तुळशिराम कोकाटे यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments