लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 फेब्रुवारी 2018
परळीवैद्यनाथ:- दि.12 -13 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त परळी शहरात प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान व अन्य राज्यातून भक्त येणे सुरू झाले असून शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळे करणारे साहित्य, हातगाडे, पानटपऱ्या, वेगवेगळी नादुरूस्त
वाहने व चालू वाहने दिसून येत आहेत. त्यामुळे वाहतुकीची समस्या उदभवत आहे. तसेच परळी शहरातील उड्डाणपुल ते उपजिल्हा रूग्णालयाच्या रोड दरम्यान भर रस्त्यावरच वाहने उभा केलेली असतात तसेच फळांचे गाडेही लावलेली दिसून येतात.
राणी लक्ष्मीबाई टावर ते जिजामाता उद्यान परिसरात रस्त्यावरच भेळ,
पावभाजी,आईस्क्रीमची गाडे लावलेले असतात. तसेच वैद्यनाथ मंदिर ते आझाद
चौक दरम्यानच्या रस्त्यावरही दोन्ही बाजुने वाहने दिसतात. हे अतिक्रमण
वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. आझाद चौक ते बसस्टॅंड, उड्डाणपुल रस्त्यावर
ऍटोरिक्षे लावलेले असता तसेच जड वाहनेही उभे केली जातात. सकाळच्यावेळी
ट्रॅव्हल्स थांबविल्या जातात. हे सर्व धोकादायक आहे महाशिवरात्री निमित्त
राज्य व परराज्यातून हजारो भाविक वाहनातून येतात त्यांचे वाहने हे परळी
शहरात आल्यानंतर पुन्हा वर्दळ वाढते. त्यामुळे आपण शहरातील वाहतुक
व्यवस्था व यात्रेकरूंसाठी विविध सुविधा निर्माण करून देण्यासाठी वंदे
मातरम चे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपभाऊ जोशी यांनी परळी न.प. ला निवेदन
दिले असून शहरात रेल्वेस्टेशन, बसस्टॅंड रोड,यात्रा परिसरात व प्रमुख
चौकात सी.सी.टी.व्ही.कॅमेऱ्याची सुविधा उपलब्ध करून गैरसोय टाळण्या
संदर्भात ही सदरील निवेदनात जोशी यांनी सांगितले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments