लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018
स्वेरीत स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन संपन्न
पंढरपूर- ‘प्रशासकीय स्पर्धा परीक्षेत अलीकडील काळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढल्यास साधारण अभियांत्रिकीचे ६० ते ६५ टक्के, वैद्यकीय क्षेत्रातील २० टक्के आणि उर्वरित सर्व क्षेत्रातील १५ टक्के आहे. त्यातून आय.आय.टी. मधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अधिक असतात. त्यांना स्पर्धा परीक्षेची प्राथमिक माहिती असते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून अभियांत्रिकी उत्तीर्ण झाल्यानंतर गेट परीक्षेचा उत्तम अभ्यास करून आय. आय. टी. मध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वात महत्वाचा म्हणजे आपल्यासमोर असलेले उमेदवार हे मोठ मोठ्या महाविद्यालयातून आलेले आहेत असे समजून आपण न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्या’ यश निश्चित मिळेल आणि स्पर्धा परीक्षा ही सोपी व सुलभ असते परंतु त्यासाठी आपली तयारी उत्तम असली पाहिजे. त्यातून एम.पी.एस.सी व यु. पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा जवळपास सारख्या असून पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परीक्षकांसमोर आपले सादरीकरण कशाप्रकारे होते याला खूप महत्व आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी निखील पिंगळे यांनी केले.
स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्ष, तृतीय वर्ष आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेबाबत आयोजिलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात पंढरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे मार्गदर्शन होते. पोलीस उपविभागीय अधिकारी पिंगळे पुढे म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षेला हुशार विद्यार्थी बसतात परंतु येथील शिक्षक वर्ग पाहता व त्यांची विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेण्याचे तंत्र पाहता येथील सर्व विद्यार्थी हुशार आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी पूर्णपणे करावी त्यासाठी सर्वप्रथम अभ्यासाचे प्लॅनिंग करावे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम समजून घेवून अभ्यास करावा व सराव करावा. तसेच आपले लक्ष विचलित होणार नाही यासाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळेपर्यंत नातेवाईक, मित्र मंडळी आणि मोबाईल यासारख्या प्रलोभनापासून दूर राहावे. तरच स्पर्धा परीक्षेत अभ्यासाची एकाग्रता रहाते. एकाच वर्षात एम.पी.एस.सी., यु. पी.एस.सी. बरोबरच एस.एस.बी.,एस.बी.आय.आय.बी.पी. एस.,आय.बी., सी.बी.एस.सी., अशी परीक्षा देता येवू शकतात. त्यासाठी शॉर्ट टर्म प्लॅनिंग, मिडीयम टर्म प्लॅनिंग व लॉंग टर्म प्लॅनिंग अशी विभागणी करून अभ्यास केल्यास कोणतीही परीक्षा अवघड नाही. नियोजनबद्ध अभ्यास करण्यासाठी आपण हातात एखादा विषय अभ्यासासाठी घेतला तर सलग वाचून तो पर्ण करण्याचे ध्यास ठेवल्यास आपण किती तास अभ्यास केला याकडेही लक्ष जात नाही. एकूणच स्पर्धा परीक्षेत स्पर्धकाला जवळजवळ ०.००१ टक्के एवढी काळजी घ्यावी लागते. कारण त्यात एकेका मार्काचे महत्व खूप असते. त्यामुळे ज्या रँकसाठी आपण प्रयत्न करतो ती रँक केवळ एक मार्क कमी पडल्यामुळे मिळू शकत नाही. असे सांगून स्पर्धा परीक्षेकारीता आवश्यक वयोमर्यादा, अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप, उपलब्ध पुस्तके व त्यासाठी आवश्यक गुण आणि मिळणारी पोस्टिंग आदी तपशीलवार माहिती दिली. यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत प्रश्न विचारले असता याला त्यांनी समर्पक उत्तरे दिली.यावेळी बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.आर.जी.कुलकर्णी,डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, अधिष्ठाता, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. करण पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता प्रा सचिन गवळी, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार,प्रा. ए.ए. मोटे, प्रा.पल्लवी जाधव, प्रा.लखन जाधव, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालनकरून आभार मानले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments