भाड्याने राहणाऱ्यांची माहिती पोलीस प्रशासनास द्यावी अप्पर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
          सोलापूर  दि. 15 :-  घरमालक, प्रॉपर्टी डिलर / ब्रोकर / एजंन्ट जुने वाहन विक्री - खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांनी जिल्ह्यात  नव्याने भाड्याने राहण्यास येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची माहिती  जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असे आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत.
            देशात,राज्यात व महत्वाच्या शहरात दहशतवादी कारवायात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी हे स्थानिक लोकांत मिसळून तात्पुरत्या स्वरूपात वास्तव्य करून घातपाती कारवायांना अंतिमरूप देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी व मालमत्तेचे नुकसान होत असून त्याचबरोबर अशा घटनांमुळे जनमाणसांमध्ये घबराटीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना वारंवार घडत आहेत. सदर दहशतवादी कारवायाच्या वेळी ते भाड्याने रूम / प्लॉट / लॉज / घेवून राहतात. तसेच मस्जिद, चर्च, धर्मशाळा, येथे आश्रय घेतात किंवा सदरची जागा विकत किंवा लिजने घेतात. यासाठी  ते स्थानिक ओळख म्हणून प्रॉपर्टी डिलर / ब्रोकर / एजंन्ट जुने वाहन विक्री – खरेदी करणारे दुकानदार यांची मदत घेतात.
            जिल्ह्यात नवीन राहण्यासाठी येणारे व्यक्ती यांची माहिती असणे आवश्यक असून अशी माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे गरजचे आहे. जेणेकरुन भविष्यात होणाऱ्या  दहशतवादी कारवाईस, गुन्ह्यास प्रतिबंध होऊ शकतो. सार्वजनिक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आबाधित राहण्यास मदत होईल आणि लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांतता अबाधित राहील .
             यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर / ब्रोकर / एजंन्ट जुने वाहन विक्री - खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाड्याने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 अन्वये कोणत्याही अनोळखी नवीन राहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात जी - जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलीस स्टेशनला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलीसांना माहिती न देता उपलब्ध करून देणे. तसेच  नवीन, जुने वाहन घेण्यास येणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्या संबंधीची संपूर्ण माहिती, तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पेालीस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना पोलीसांना माहिती न देता जुने वाहन खरेदी -  विक्री / भाड्याने उपलब्ध करुन देण्यास कलम 144 अन्वये बदी असून हे आदेश दिनांक 5/2/2018 ते 5/4/2018 कालावधीत सोलापूर जिल्ह्याचे ग्रामीण हद्दीत ( पोलीस आयुक्तालय हद्द वगळून ) सर्व नगरपालिका हद्दीत लागू असल्याचे  अप्पर जिल्हादंडाधिकारी  श्री. तेली यांनी आदेशात नमूद केले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments