लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- भारतील लष्करातील निवृत्त मेजर व देशाच्या सीमेचया रक्षणार्थ 1962, 1965 व 1971 च्या लढायांमध्ये प्राणपणाने लढलेले पंढरीतील सुपूत्र निवृत्त मेजर लक्ष्मणराव शत्रुघ्न आगावणे (वय-72) यांचे बुधवार दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास पंढरीतील राहते घरी हृदयविकाराने दु:खद निधन झाले.
या वयातही त्यांची देशसेवेची तळमळ व देशभक्ती वाखाणण्याजोगी होती. पंढरीतील विविध सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असे. अत्यंत मनमिळावु व आनंदी स्वभावाच्या या देशभक्त वीराच्या मृत्युमुळे पंढरपूर पंचक्रोशीत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भुमीमध्ये बुधवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंढरीतील विविध क्षेत्रातील मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती कमल आगावणे, सुर्यकांत आगावणे (भुसेना निवृत्त नाईक), शिवाजी आगावणे, विजय आगावणे (भुसेना,निवृत्त हवालदार ) ही तीन मुलं, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments