लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
निलेश चाळक बीड : रासायनिक पावडरने आम्ही तुमचे सोन्याचे दागिने उजळून देतो असे सांगत दोघा भामट्यानी चार लाखाचे दागिने लंपास केले. हि घटना बुधवारी अंबाजोगाई शहरात घडली.
येथील चौसाळकर कॉलनी भागात राहणाऱ्या दिपाली दिनकर कुलकर्णी यांच्या घरी दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दोन भामटे आले. आम्ही मुंबई येथील कंपनीकडून आलो असून रासायनिक पावडरच्या साह्याने भांडे उजळून देण्याचे काम करतो अशी बतावणी त्या दोघांनी केली. कुलकर्णी यांनी त्यांना नकार दिला असतानाही एकदा तरी वापरून पहा असे म्हणत त्या दोघांनी बळजबरीने त्यांना घरातील कुकर आणावयास लावले आणि त्यांच्या हातावर उग्र वास येणारी तपकिरी रंगाची थंड पावडर ठेवली. कुकर साफ करून झाल्यानंतर त्या दोघांनी तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने देखील उजळून देऊ असे सांगतिले. याला भुलून कुलकर्णी यांनी गळ्यातील सोन्याचे ५ तोळ्याचे गंठन आणि १० तोळ्याच्या बांगड्या व गोट असे एकूण ४ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने त्यांच्याकडे दिले. सदरील दागिने एका डब्यात ठेवल्यासारखे करत भामट्यांनी डब्यात पावडर आणि पाणी टाकले. तो डब्बा कुलकर्णी यांच्या हातात देत थोड्यावेळाने उघडून पाहण्यास सांगितले आणि ते निघून गेले. थोड्यावेळाने कुलकर्णी यांनी डब्बा उघडून पहिला असता त्यात दागिने नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेत भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते आढळून आले नाहीत. अखेर त्यांनी सायंकाळी अंबाजोगाई शहर पोलिसात तक्रार दिली.
दिपाली कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात भामट्यांवर कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन तडसे हे करत आहेत.
दिपाली कुलकर्णी यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात भामट्यांवर कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक गजानन तडसे हे करत आहेत.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments