बीडमध्ये ना..भुतो...ना भविष्य अशी शिवजयंती साजरी केली जाणार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!


पंढरपूर LIVE 15 फेब्रुवारी 2018
ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची आव्हान 
बीड: डिजेचे ध्वनी प्रदुषण न करता सिक्कम, केरळ, गोवा येथील ४०० पेक्षा अधिक कलावंतांचे झांझपथक, ढोल पथक व सांस्कृतिक कार्यक्रमातून साजरी होणारी शिवजयंती शिवप्रेमींसाठी पर्वणी होणार आहे. त्याअनुशंगाने सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने तयारी करण्यात आली असून ना..भुतो...ना भविष्य अशी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक शिवजयंतीचे साक्षीदार होण्याचे अवाहन रा.कॉ चे युवानेते तथा जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर व समिती अध्यक्ष प्रा. विजय पवार यांनी पत्रकार परिषदेद्वारे  केले आहे.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे हे ५१ वे वर्षे असून संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव पार पाडला जाणार आहे. गेल्या महिन्याभरापासून समितीचे सदस्य नियोजनावर मेहनत घेत असून तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी २ च्या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूकीस सुरवात होणार आहे. माळीवेस - साठे चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असा मिरवणूक मार्ग असून माळीवेस, पायल साडी सेंटर व छत्रपती श्विाजी महाराज चौक येथे कलावंताचे प्रकार आणि लेजर शो चे सादरीकरण होणार आहे. सुरक्षितेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त शिवाय समितीचे ४०० स्वयंसेवक राहणार आहेत. मिरवणुक मार्गावरील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ज्या ठिकाणी उघड्या नाल्या आाहेत तिथे बॅरेगेट्स लावण्यात येणार आहेत. शिवाय पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून अधिकाअधिक बीडकरांना सह कुटूंब या ऐतिहासिक मिरवणुकीचा साक्षीदार होण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी पत्रकार परिषदेस सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. विजय पवार, जि. प. सदस्य संदीप क्षीरसागर, सचिव सुरेश् नखाते, उपाध्यक्ष फारूक पटेल, दिलीप भोसले, गटनेते अमर नाईकवाडे, गोपाल लड्डा, प्रा. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, डॉ. तिडके, रंजीत डिसले, अविनाश काळे, गोरख शिंदे, डॉ. संजय जानवळे, अ‍ॅड. हेमंतबप्पा औटे, लईकभाई उपस्थित होते. 
महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था अन नियोजन शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडे 
दरवर्षीची वाढती गर्दी पाहता सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने महिलांसाठी विशेष बैठक व्यवस्था राबविण्यात येणार आहे. ही पद्धत यंदा प्रथमच राबविली जात असल्याने महिलांची गैरसोय होणार नसल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. ठिकठिकाणी मैदानातील गॅलरीप्रमाणे चढत्या क्रमाने बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्षपद यंदा प्रथमच शिक्षण क्षेत्राला मिळाले आहे. प्रा. विजय पवार यांची निवड झाली असून नियोजनाबाबत बीडकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळेच नियोजनाची जबाबदारी शिाक्षण क्षेत्रातील व्यक्तींकडे सोपविण्यात आली आाहे.
लेझर शो ठरणार मिरवणुकीचे आकर्षन
मिरवणुक मार्गावील चार ठिकाणी लेझर शो करण्यात येणार आहे. रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महराज पुतळ्याजवळ भव्य लेझर शो दर्शिवण्यात येणार आहे. अशा लेझर शो चे प्रथमच आयोजन करण्यात आले असून हा शो च मिरवणुकीचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
संयाजी शिंदे यांचे व्याख्यान
केवळ मिरवणुकच नाही तर शिवजयंती निमित्त सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम समितीने हाती घेतले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वा. येथील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथे तरुणांसाठी प्रेरणादायी व्याख्यान तर १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. विठ्ठल लहाने हे नागरिकांना संबोधित करणार आहेत.  

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments