लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2018
पंढरपूर- स्वेरीमध्ये नेहमीप्रमाणेच नियमित वर्ग सुरु झाले आणि जसजसे घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसतसे वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये चुळबुळ सुरु झाली. काटा बारावर येताच स्वेरीच्या सर्व विभागात एल.सी.डी. प्रोजेक्टर चालू करण्याच्या तयारीत प्राचार्य, उपप्राचार्य,सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग आणि पाच हजार विद्यार्थी- विद्यार्थीनींसह सर्वांनी आपापल्या वर्गात बाकावर बसून घेतले. साधारण बारा वाजून वीस मिनिटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शनपर भाषण सुरु झाले ते दुपारी दोन वाजता संपले. दरम्यान पंतप्रधान मोदी सरांनी केलेल्या दीड तासाच्या मार्गदर्शनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील परीक्षेचा तणाव काही प्रमाणात का होईना दूर झाला आणि मोदी सरांनी उत्कृष्ठ मार्गदर्शन करून परीक्षार्थ्यांना यशाचा कानमंत्र देखील दिला.त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास अजून वाढला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे अगोदरच नियोजित केले होते. त्यामुळे स्वेरीतील अभियांत्रिकी, फार्मसी या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी विभागा बरोबरच एम.बी.ए. या पदव्युत्तर पदवी विभागात देखील मोदींच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाचा योग्य फायदा होईल या दृष्टीने संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चारही महाविद्यालयातील प्रत्येक वर्गात, सेमिनार हॉलमध्ये भव्य पडद्यावर मोदी सरांच्या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी कोणत्या मानसिकतेत जावे?, अभ्यास एकाग्रपणे कसे करावे?, परीक्षेचा पेपर लिहताना तणाव विरहीत कसे असावे? या व अशा अनेक टिप्स मोदी सरांनी तमाम विद्यार्थ्यांना दिल्या. स्वेरी संचलित अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग तसेच फार्मसी, डिप्लोमा इंजिनिअरिंग,टी.पी.ओ सेमिनार हॉल, वातानुकुलीत आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये तसेच फार्मसीच्या बाजूला असणाऱ्या एन.के.एन. विभागात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते. तसेच स्वेरीच्या कॅम्पस मध्ये तब्बल दोन तास प्रा. मोदी सरांचाच आवाज ऐकू येत होता.यावेळी सर्वजण विद्यार्थी बनले होते. सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. आर. जी.कुलकर्णी, डिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एन.डी मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. सतीश मांडवे, अभियांत्रिकीचे उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी,विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी हे मोदी सरांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाने आनंदीत झाले.
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments