लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!
एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 फेब्रुवारी 2018
मनविभोरचा वतीने आयोजित करण्यात आलेल्या कलाविष्कार या कार्यक्रमाचे उदघाटन पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले , नाट्यसमीक्षक श्री नंदकुमार कुलकर्णी , पत्रकार श्री भगवानराव वानखेडे , युवा रंगकर्मी संकेत कुलकर्णी , पंढरपूर बँकेचे व्हा . चेअरमन श्री दीपक शेटे , उदय उत्पात , माधुरीताई जोशी , नादब्रम्ह च्या उपाध्यक्षा सौ वंदना तारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना वैष्णवी उत्पात म्हणाल्या की , दिनांक १ जाने २०१८ ते १५ जानेवारी २०१८ या कालावधीमध्ये नृत्य व अभिनय विकास कार्यशाळेचे आयोजन केले होते त्यास पंढरपूरकरांनी उत्तम प्रतिसाद देत 50 हुन अधिक युवक युवतींनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला होता, याच कलाकारांच्या कलेचा "कलाविष्कार" हा सांस्कृतिक नजराणा पंढरपूरकरांसमोर सादर करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. मनविभोरच्या माध्यमातून जोडले गेलेले हे नवीन शिलेदार आगामी काळात पंढरीच्या सांस्कृतिक चळवळीचे शिलेदार बनतील असा आशावादही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला .
कार्यक्रमाचे उदघाटक नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले म्हणाल्या की, नृत्य व अभिनय यासारखी कला अंगी असणे आवश्यक आहे . मोबाईल , संगणक यामुळे आजची पिढी या क्षेत्राकडे वळत असताना ही नृत्य , अभिनय कला वृंधिगत व्हावी म्हणून प्रशिक्षण शिबीर आयोजित केले व त्यांच्या कलेचा नजराणा पंढरपूरकरांसमोर आणला, त्याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत . मनविभोरच्या आगामी वाटचालीस त्यांनी शुभेछया दिल्या .
कार्यक्रमाचे अधयक्षीय समारोपामध्ये बोलताना नंदकुमार कुलकर्णी सर म्हणाले की , नृत्य आणि अभिनय ही कलेची मूलभूत अंग मानली जातात , कवठेकर प्रशालेच्या मंचावरून नवनवीन कलाकार घडल्याच्या मी साक्षीदार आहे . त्याच मंचावर आमचीच मुले ही मनविभोरच्या माध्यमातून नवनवीन कलाकार घडवू पाहत आहेत , हे विशेष उल्लेखनीय आहे . कोणत्याही कलेतून मिळणारा आनंद हा पैशात न मोजता येणारा असतो , त्यातून मिळणारे समाधान जीवनाला नवीन ऊर्जा आणि बळ देणारे असते. मनविभोरच्या माध्यमातून नवनवीन कलाकार उदयास येवोत अशी मनीषाही याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भगवानराव वानखेडे म्हणाले की , पंढरपूरसारख्या ग्रामीण भागात मनविभोरचे कार्य हे पंढरपूरची सांस्कृतिक प्रतिष्ठा वाढवणारे आहे, कलाविष्कारच्या माध्यमातून नवनवीन कलाकारांच्या प्रतिभा समाजाला दिसणार आहेत , असेच समाजोपयोगी कार्यक्रम घडत राहोत अशा सदिच्छा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संकेत कुलकर्णी म्हणाले की नवनवीन कलाकारांना मनविभोर नेहमी प्रोत्साहन देत आले आहे , प्रशिक्षणाचा कालावधीपासून कार्यक्रमाच्यापर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे , मनविभोरने शिल्पकारांची भूमिका बजावली असल्याचेहेही यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उदय उत्पात म्हणाले की संतांची मांदियाळी म्हणून ओळखली जाणारी पंढरी नगरी कलावंताची नगरी म्हणून ओळखली जावी यासाठी मनविभोर प्रयत्नशील आहे , याच्या माध्यमातून नावेदित कलाकारांना प्रोत्साहन मिळणार असून पंढरीचा नावलौकिक होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले .
कलाविष्कार या कार्यक्रमामध्ये सादर झालेल्या गीत , नृत्य व अभिनयाच्या अनोख्या कलाविष्काराने पंढरपूरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले .
याप्रसंगी अर्बन बंकेंचे व्हा .चेअरमन दीपक शेटे , शांताराम कुलकर्णी सर , माधुरीताई जोशी आदी मान्यवर उपस्थित होते .
मनविभोरमध्ये परीक्षक म्हणून कार्यरत असलेले कन्हैया उत्पात, पल्लवी दशरथ , वेदांत करपे , रेणुका बडवे , रसिका संत , किरण देठे यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
कार्यक्रम यशस्वी होणेसाठी पूजा माने , वैष्णवी उत्पात, कैवल्य कुलकर्णी,नुपुरा रुपलग , अमृता माणकेश्वर, शब्दाली भंडारकवठेकर , समीर रानरुई , वैभवी तारे , पूजा बडवे , श्रुती आराध्ये , विशाल बडके, चैतन्य देहूकर , ओंकार कुलकर्णी , प्रशांत गव्हाणे, अमन देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया उत्पात यांनी केले , प्रास्ताविक वैष्णवी उत्पात यांनी केले , तर आभार कैवल्य कुलकर्णी यांनी मानले .
संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!
तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.
पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत.
*Mail:- livepandharpur@gmail.com
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments