पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अमित डोंबे

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..!

एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 10 फेब्रुवारी 2018

पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या अध्यक्षपदी अमित डोंबे यंाची निवड करण्यात आली असुन मा.केंद्रीय गृहमंत्री व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांच्याहस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी मा.गृहराज्यमंत्री सिध्दराम म्हेत्रे,आ.प्रणितीताई शिंदे,मा.आ.प्रकाश यलगुलवार,सोलापूर शहर कॉगे्रस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश वाले,चेतन नरोटे,पंढरपूर तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष ऍड.राजेश भादुले आदी उपस्थित होते.
      सोलापूर जिल्ह्यात कॉग्रेसच्या पुढील वाटचालीबाबत ज्येष्ठ नेते मा.खा.सुशिलकुमार शिंदे यांनी स्वत: लक्ष घातले आहे.यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्यात व देशात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर आल्यामुळे भविष्यात सर्वसामान्य जनतेला खर्‍या अर्थाने न्याय मिळवून देणार्‍या कॉग्रेसच्याच हाती जनता सत्ता सोपविणार आहे.मात्र सामान्य जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करण्यासाठी,त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आणि वेळप्रसंगी या समस्या सोडविण्यासाठी उग्र आंदोलने करण्याची जबाबदारी युवक कॉग्रेसची आहे.
     या निवडीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नुतन शहराध्यक्ष अमित डोंबे म्हणाले की,आपण अतिशय निष्ठेने कॉगेेसचा झेंडा खांद्यावर घेवून आतापर्यंत काम करीत आलो आहोत.आणि यापुढेही या पदाच्या माध्यामातून आपणावर सोपविलेली जबाबदारी मोठया विश्‍वासाने पार पाडणार आहोत.पंढरपूर शहरात प्रत्येक प्रभागात कॉग्रेेसची शाखा स्थापन करुन सामान्य जनतेच्या प्रश्‍नासाठी संघर्ष करणार आहे.
      हे प्रत्र प्रदान करताना पंढरपूर युवक कॉग्रेेसचे पांडुरंग घोडके,विजय कुलकर्णी,नरेश सचदेव,आकाश कौलवार,बाबा लगसकर,अभिजीत खटावकर,अनिल घाडगे आदी उपस्थित होते. 

संपुर्ण महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपर्‍यातील तब्बल 16 लाखांहून अधिक मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले... पंढरीतील सर्वप्रथम ई-न्यूज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पंढरपूर Live वर खास शिवजयंती निमित्त फक्त 1000/- रु. मध्ये शिवप्रेमींची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे..!

तरी आपण आपल्या शुभेच्छा जाहिराती देवून सहकार्य करावे. या बरोबरच आपले शिव विचारांवरील अथवा शिव पराक्रमावरील कांही लेख- साहित्य असेल तर ते सुध्दा प्रसिध्दीस द्यावे ही नम्र विनंती.


पंढरपूर लाईव्ह च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पंढरी गौरव पुरस्कारासाठी खालीलपैकी इच्छूक गुणवंतांनी आपले प्रस्ताव दि. 10 फेब्रुवारी 2018 पर्यंत पाठवावेत. 
*Mail:- livepandharpur@gmail.com





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments