रत्नमहर्षी हायस्कुल व क्वालिटी इंग्लिश स्कुल मध्ये स्नेहसंमेलन संपन्न..! जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची-श्रीकांत गायकवाड

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018




विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेकडे झेप घ्यावीजीवनात  वेगाबरोबर दिशा महत्वाची आहे, असे प्रतिपादन नांदेडचे डेप्युटी कलेक्टर डॉ.श्रीकांत गायकवाड यांनी केले. पंढरपूर तालुक्यातील आव्हे येथील रत्नमहर्षी मोहिते-पाटील माध्यमिक विद्यालय व क्वालिटी इंग्लिश स्कूलम ध्ये १६ वे वार्षिक स्नेहसंमेलन  उत्साहात पार पडले. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर प्रबोधनपर कार्यक्रमही विद्यार्थ्यांनी सादर केले. या स्नेहसंमेलनाचे उद्‌घाटन डॉ.श्रीकांत गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स प्रा.लि.पुणेचे चेअरमन सिध्दार्थ शहा व महाराष्ट्र राज्य खाण व क्रशर उद्योजक महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक नवनाथ जगताप हे होते .
तांत्रिक पध्दतीने नेटके काम करावे व यशाची झेप समाजात उठवावी असा सुवर्ण शुभ संदेश उपस्थितांना महाराष्ट्रातील सोन्याचे प्रसिद्ध उद्धोजक श्री.सिध्दार्थ शहा यांनी दिला,
त्याबरोबरच गरीबीवर भगीरथ कष्टाच्या साहय्याने सहजपने मात करावी व स्वत:च्या  पायावर कसे उभे रहावे याविषयी उपस्थितांना श्री. बाळासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी गुलमोर स्कूल माळीनगरचे प्रिन्सीपल दुर्गानाथ देशमुखपंढरपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,नायब.तहसीलदार नाथाजी पाटील, केंद्रप्रमुख रंगनाथ घोडके ,जांबूडचे उपसरपंच नारायण पाटील,  कवी  सचिन सावंतउद्धोजक सुभाषकाकडे,  सरपंच बिटू करवर, सुरेश पाटील, गुलाब शेवतकरराणू पाटीलसंस्था संचालक युवराज जगतापपोलीस पाटील दादा कांबळेविजय खळगे  हे उपस्थित होते.
यावेळी आदर्श विद्यार्थी धीरज युवराज इनामदार व रोहित बाळासाहेब पिसे,  आदर्श विद्यार्थीनी प्रणाली नागनाथ रोडगे व रुपाली पोपट पाटीलआदर्श माता उमा सचिन कडलासकर, आदर्श पिता बंडू पवार या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
यावेळी शाळेतील मुलांना शिक्षणाने कसे परिवर्तन घडते व यासाठी मार्गदर्शन म्हणून परिसरातील उच्चशिक्षित,नोकरदार,तरुण उद्द्योजक यामध्ये रामचंद्र पाटील, तानाजी कांबळे ,नागेश ढोले, महाराष्ट्र राज्य तरुण उद्दोजक पुरस्काराने सन्मानित सुभाष काकडे यांचे संस्थेच्या वतीने,प्रमुख पाहुण्याचे हस्ते शाल, श्रीफळ ,रोपटे देऊन मानसन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमास पालक प्रतिनिधी वसंत पाटील, बंडू पवार, पोपट पाटील, नागेश रोडगे, सचिन कडलासकर, युवराज इनामदार, डॉ.कांतीलाल पानसरे व परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.  सुत्रसंचालन होरे सर व प्रक्षाळे मॅडम यांनी केले,आभार सचिव विनोद जगताप यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments