लोकमान्य विद्यालयात शिवजन्मोत्सवा निमित्त शिवव्याख्यानाचे आयोजन

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 21 फेब्रुवारी 2018


पंढरपूर नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालयात शिव जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवचरित्राचे अभ्यासक ह.भ.प.श्री अनिल महाराज बडवे,Advt.श्री आशुतोष बडवे,पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक श्री हरिष ताठे,तसेच न.प. शिक्षण समितीचे सभापती श्री विवेक परदेशी उपस्थित होते.
याप्रसंगी लोकमान्य शाळेतील विद्यार्थ्यांनी आणी प्रथमिक शाळा क्रं ८ व १५ च्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषण,गोष्टीे तसेच पोवाडे सादर केले. शिक्षण समीती चेअरमन विवेक परदेशी यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात आला.
श्री आशुतोष बडवे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या आधारे सर्वांचे प्रबोधन केले व प्राचीन किल्ले पाहण्यासाठी शाळेची सहल काढावी असे सुचवले,
श्री हरिष ताठे यांनी 
विद्यालयाचे नूतन सभापती श्री विवेक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले, विध्यार्थीनी आपला विकास कसा करावा, संधी चा फायदा घेऊन स्टेज डेरिंग कशी वाढवावी त्या बद्दल विध्यार्थांना मार्गदर्शन केले व 
चेअरमन श्री विवेक परदेशी यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांचे कौतुक केले, वक्तृत्व, स्टेज डेरिंग , नवनवीन कला  शिकण्याचे तुमचे वय आहे असे सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना अवाहन केले की वर्षभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आपण आयोजन करणार आहोत तुम्ही त्यात भाग घ्या , सर्वांना संधी देण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री डिंगरे सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. श्री इरकल सर,श्री वागज सर व श्री लांबतुरे सर यांना चेअरमन यांनी काराक्रमाची जवाबदारी सोपवली होती. सूत्रसंचालन श्री पुरी सर यांनी केले व 
श्रीमती साखरे यांनी आभार मानले.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments