पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 17 मार्च 2018
पंढरपूर, दि. 17 :- मंगळवेढा तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव गुरुवार दिनांक 22 मार्च 2018 रोजी सकाळी 11.00 तहसिल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती तहसिलदारआप्पासाहेब समिंदर यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे 106.24 ब्रास वाळू जप्त केली असून हा वाळू साठा तहसिल कार्यालयाच्या आवारात ठेवण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत प्रति ब्रास 7 हजार प्रमाणे सुमारे 7 लाख 43 हजार 680 रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. सदर लिलावात भाग घेण्यासाठी 2 हजार रुपये विनापरतावा अर्ज फी आणि सरकारी बोली किंमतीच्या 20 टक्के म्हणजेच 1 लाख 48 हजार 736 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. लिलावात सर्वोत्तम बोलीची रक्कम लावलेल्या लिलावधारकाने संपूर्ण रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी. लिलावधारकाने लिलावाची रक्कम भरल्यानंतर स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी केले आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments