विधी साक्षरता मंडळाची स्थापना

पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचकांना व जाहिरातदार बंधु-भगिणींना गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 17 मार्च 2018



           पंढरपूर, दि. 17 :- विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याची साक्ष्रता यावी यासाठी  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तालूका विधी सेवा समिती मार्फत विधी साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश पी.आर. देशमुख यांनी दिली.
            या विधी साक्षरता मंडळाचे उद्घाटन मातोश्री सरुबाई माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्याल, भटुंबरे ता. पंढरपूर येथे जिल्हा न्यायाधीश पी.आर. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक श्री.माने, प्राचार्य श्री.कोकरे तसेच न्यायालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा न्यायाधीश पी.आर.देशमुख बोलताना म्हणाले, तालुका विधी सेवा समिती मार्फत विविध स्तरावर कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात येते. मुलांना अनुकूल कायदेशीर सेवा आणि संरक्षणाची योजना लागू करण्यात आली आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याची साक्ष्रता यावी यासाठी कायद्याची पुस्तके ग्रंथालयात देण्यात येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या योजनेचा लाभ घेवून कायदे विषयक माहिती पालक व इतर लोकांना द्यावी असे आवाहनही जिल्हा न्यायाधीश पी.आर. देशमुख यांनी केले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments